मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Birthday Girl नेहा पेंडसेबद्दलची 'ही' गोष्ट माहिती आहे का?

Birthday Girl नेहा पेंडसेबद्दलची 'ही' गोष्ट माहिती आहे का?

Neha Pendse

Neha Pendse

मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये काम करणारी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse Birthday) आज 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  मुंबई, 29 नोव्हेंबर:  मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसेचा (Neha Pendse) समावेश होतो. एक गुणी अभिनेत्री असलेली नेहा 'मे आय कम इन मॅडम' (May I Come in Madam) या हिंदी कॉमेडी शोमुळं 'मॅडमजी' या नावानं चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे; मात्र ती तिच्या प्रोफेशनपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. तिनं दोन मुलींचा पिता असलेल्या शार्दूल सिंह (Shardul Singh) या आपल्या प्रियकराशी लग्न केलं. या लग्नानंतर चाहत्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं होतं. आज (29 नोव्हेंबर) नेहा पेंडसेचा वाढदिवस (Neha Pendse Birthday) असून, ती 37 वर्षांची झाली आहे. 29 नोव्हेंबर 1984 रोजी नेहाचा मुंबईमध्ये जन्म झाला होता. बालकलाकार म्हणून तिनं आपल्या अभिनय क्षेत्रातल्या करिअरची सुरुवात केली होती. तिच्या 'लव्ह लाइफ'बद्दलच्या काही खास गोष्टींबद्दलचं वृत्त 'एशियानेट हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे.

  5 जानेवारी 2020 रोजी नेहा पेंडसेनं आपला प्रियकर शार्दूल सिंहशी लग्न केलं होतं. पुण्यामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीनं दोघांचं लग्न (Maharashtrian wedding) झालं होतं. लग्नात तिनं नऊवारी साडीदेखील नेसली होती. शार्दूलचे यापूर्वी दोन विवाह आणि घटस्फोट झाले (Divorcee) असल्याचा आणि त्याला दोन मुली असल्याचा खुलासा लग्नानंतर झाला होता. यामुळं नेहाचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं.

  नेहा आणि शार्दूलची लव्हस्टोरी

  नेहा आणि शार्दूलची लव्हस्टोरी (Neha-Shardul Lovestory) एका पार्टीपासून सुरू झाली होती. कामानिमित्त दोघांनी एकमेकांचे मोबाइल नंबर एक्स्चेंज केले. दोघांची पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा शार्दूल 'प्रायमस' नावाच्या को-वर्किंग कन्सेप्टवर काम करत होता. नेहा आपली ब्रँड अॅम्बेसेडर व्हावी, अशी शार्दुलची इच्छा होती. नेहानं ती ऑफर स्वीकारली आणि ती प्रायमसची ब्रँड अॅम्बेसेडर बनली. नेहाला पहिल्या भेटीतच शार्दूल आवडला होता; पण तिनं आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. शार्दूलने मात्र जास्त उशीर न करता तिसऱ्या भेटीमध्ये नेहाला प्रपोज केलं होतं.

  नेहानं शार्दूलसोबत आपल्या पूर्वीच्या ब्रेकअपविषयीच्या गोष्टी शेअर केल्या होत्या, तर शार्दूलनंही त्याच्या घटस्फोटाशी संबंधित गोष्टी नेहाला सांगितल्या होत्या. शार्दूलला दोन मुली असल्याचीही माहिती नेहाला होती. असं असूनही दोघांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष लग्नापूर्वी दोघं एक वर्ष लिव्ह-इनमध्ये (Live-in) राहत होते.

  लिव्ह-इनमध्ये राहत असल्यापासूनच दोघांच्या नात्यावर लोकांनी टीका केली होती. 'नेहाला शार्दूलपेक्षा चांगला नवरा मिळू शकला असता. तिनं पैशांसाठी शार्दुलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे,' असे आरोप करण्यात आले होते. याबाबत नेहानं आपली प्रतिक्रिया दिली होती. 'आमचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळं आम्ही लग्न करत आहोत. लोकांना जो विचार करायचाय तो त्यांनी करावा,' असं नेहा म्हणाली होती.

  बिग बॉस 12 ची स्पर्धक असलेल्या नेहानं वयाच्या दहाव्या वर्षी पहिल्यांदा व्यावसायिक अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. आपल्या पहिल्या कामासाठी तिला 500 रुपये मिळाले होते. ते तिनं आपल्या पालकांच्या हवाली केले होते. मराठीसोबतच नेहानं अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या आहेत. नाना पाटेकर यांच्या नटसम्राट या हिट चित्रपटातल्या तिच्या भूमिकेची लोकांनी स्तुती केली होती. दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपट केल्यानंतर नेहानं टेलिव्हिजनकडे आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स न मिळाल्यानं आपण टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. 'मे आय कम इन मॅडम' या शोची ऑफर आली तेव्हा ती चांगली वाटली, म्हणून ती स्विकारली, असं नेहाचं म्हणणं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Entertainment