दुसऱ्यांदा प्रेम नको रे बाबा- नेहा कक्कर

स्वतःला सावरण्याची माझी जी लढाई होती ती जीवघेणी होती. माझ्यासाठी ते दिवस फारच वाईट होते.

  • Share this:

ब्रेकअपनंतर बॉलिवूड गायिका नेहा कक्कर चर्चेत आली आली. नुकतंच तिने ऋषिकेशमध्ये नवीन घर आणि एक गाडी घेतली. या घराचे आणि गाडीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.

दरम्यान नेहाने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ब्रेकअपचे अनेक खुलासे केले. तसेच हेही सांगितलं की दुसऱ्यांदा प्रेमात पडायला आता तिचं मन तयार नाही.

याबद्दल अधिक बोलताना नेहा म्हणाली की, ‘जेव्हा मी त्याच्यासोबत नात्यात होते तेव्हा मी माझ्या कुटुंबाला आणि मित्र- मैत्रिणींना फारसा वेळ देत नव्हते. माझा अधिकतर वेळ त्याच्याभोवतीच जायचा.’

‘एवढं सगळं करूनही वेळ देत नाही यावरून तो नेहमीच तक्रार करायचा. मी आता त्या नात्यातून बाहेर पडले याचंच समाधान आहे.’

‘सध्या मी दुसऱ्यांदा प्रेमात पडायला अजिबात तयार नाही. मी सध्या सिंगलच खूश आहे आणि फार आनंदी आहे. जे काही माझ्यासोबत झालं त्यात मी आनंदी आहे कारण मला आता मित्र- परिवाराचं महत्त्व समजलं आहे.’

अभिनेता हिमांश कोहलीशा झालेल्या ब्रेकअपनंतरचे काही दिवस नेहा कक्कड नैराश्यग्रस्त होती. याबद्दल बोलताना नेहा म्हणाली की, ‘माझ्यासाठी ते दिवस फारच वाईट होते. खूप कठीण काळ होता तो. मी नैराश्यग्रस्त होते. स्वतःला सावरण्याची माझी जी लढाई होती ती जीवघेणी होती. आता या सर्वातून बाहेर आली आहे. सध्या सिंगल राहणं हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 03:52 PM IST

ताज्या बातम्या