नीता अंबानी यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार प्रदान

नीता अंबानी यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार प्रदान

रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. क्रीडा क्षेतातल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आलाय.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. क्रीडा क्षेतातल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आलाय. काल दिल्लीत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा सपन्न झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ग्रामीण भागातील होतकरू युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नीता अंबानी रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठं काम उभं केलंय. गरजू खेळाडूंसाठी त्यांनी पायाभूत सुविधांसह आर्थिक सहाय्यही उपलब्ध करून दिलंय.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नीता अंबानी यांनीही ट्विटरवरून आभार मानलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2017 03:45 PM IST

ताज्या बातम्या