मुंबई, 08 नोव्हेंबर: माणसाच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. योग्य वयात योग्य शिक्षण घेतलं तर आयुष्यभराचा प्रश्न सुटतो. कारण, आपली नोकरी किंवा व्यवसाय हा आपण कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतो त्यावर अवलंबून असतो. इयत्ता बारावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे. बारावी पूर्ण झाल्यानंतर आपण शिक्षणासाठी कुठली पर्याय निवडतो त्यावर आपलं उच्च शिक्षण अवलंबून असतं. कोविड-19 महामारीच्या काळात वैद्यकीय क्षेत्राचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. मेडिकल क्षेत्रात जाण्यासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. त्यानंतर एका लांबलचक प्रवेश प्रक्रियेतून इच्छुक विद्यार्थ्यांना जावं लागतं. सध्या 2022 या वर्षासाठी मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. वैद्यकीय समुपदेशन समिती (एमसीसी) 8 नोव्हेंबर रोजी नीट पात्रतेसह अंडरग्रॅजुएट्ससाठी प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या राउंडची चॉईस फिलिंग आणि लॉकिंग विंडो बंद झाली आहे. 'एनडीटीव्ही'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
इच्छुक विद्यार्थी मंगळवारी रात्री 11 वाजून 55 मिनिटांपर्यंत दुसऱ्या राउंडसाठी महाविद्यालयांची नावं लॉक करू शकत होते. चाईस लॉक करण्यासाठी विद्यार्थ्यांना एमसीसीच्या mcc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागते. एमसीसीनं आपल्या नोटीसमध्ये म्हटलं होतं की, 'चॉईस लॉकिंग दरम्यान, तुम्ही सबमिट केलेल्या चॉईसची प्रिंट मिळविण्यासाठी भरलेले ऑप्शन लॉक करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेला ऑप्शन लॉक न केल्यास, वेळापत्रकानुसार तो आपोआप लॉक होईल.'
Career टिप्स: नक्की किती असते सेलिब्रिटीजच्या बॉडीगार्ड्सची सॅलरी? असे असतात पात्रतेचे निकष
नीट यूजी दुसऱ्या फेरीची जागा वाटप प्रक्रिया 10 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तर जागा वाटपाचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 नोव्हेंबर 2022 रोजी घोषित केला जाईल. म्हणजेच विद्यार्थ्यांनी निवडलेल्या महाविद्यालयांपैकी कोणत्या महाविद्यालनं त्यांचा अर्ज स्वीकारला याची माहिती मिळेल. विद्यार्थ्यांना नीट यूजीच्या दुसऱ्या राउंडमधील काउन्सेलिंग प्रक्रियेसाठी 12 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत दिल्या गेलेल्या महाविद्यालयांमध्ये आवश्यक ती कागदपत्रं घेऊन उपस्थित रहावं लागेल.
काउन्सेलिंग प्रक्रिया, AIQ राउंड 1, AIQ राउंड 2, AIQ मॉप-अप राऊंड आणि AIQ स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड अशा चार फेऱ्यांमध्ये आयोजित केली गेली आहे. नीट यूजी काउन्सेलिंग प्रक्रियेत निवडलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय आणि डीम्ड युनिव्हर्सिटींसह एम्स, JIPMER इत्यादी ठिकाणी प्रवेश मिळतो.
चॉईस फॉर्म भरण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतात.
1) सर्वांत अगोदर विद्यार्थ्यांनी एमसीसीच्या mcc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट दिली पाहिजे.
2) त्यानंतर 'यूजी मेडिकल काउन्सेलिंग' टॅबवर क्लिक करावं लागेल.
पर्सनल असो वा प्रोफेशनल लाईफ 'ही' पुस्तकं वाचाल तर व्हाल यशस्वी; इथे बघा पूर्ण लिस्ट
3) तिथे तुमचे लॉग-इन क्रेडेंशियल्स भरावे लागतील.
4) ओपन झालेल्या नवीन विंडोमध्ये तुमची चॉईस भरणं आवश्यक आहे.
5) त्यानंतर चॉईस लॉक करून सबमिट ऑप्शनवर क्लिक केलं पाहिजे.
6) शेवटी तुम्ही भरलेला चाईस फॉर्म डाउनलोड करून पुढील प्रक्रियेसाठी प्रिंट आउट काढून घेतली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Medical exams