News18 Lokmat

NEET 2019 Result : राजस्थानचा नलीन खंडेलवाल पहिला, महाराष्ट्राचा सार्थक भट देशात सहावा

NTA NEET 2019 Result मेडिकल विद्यार्थ्यांसाठीची देशपातळीवरची प्रवेश परीक्षा अर्थात NEET चा निकाल दुपारी जाहीर झाला. राजस्थानचा नलीन खंडेलवाल देशात पहिला आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 07:37 PM IST

NEET 2019 Result : राजस्थानचा नलीन खंडेलवाल पहिला, महाराष्ट्राचा सार्थक भट देशात सहावा

मुंबई, 5 जून : मेडिकल विद्यार्थ्यांसाठीची देशपातळीवरची प्रवेश परीक्षा अर्थात NEET चा निकाल दुपारी जाहीर झाला. राजस्थानचा नलीन खंडेलवाल देशात पहिला आला आहे. एकूण 15 लाखांहून अधिक विद्यार्थी NTA NEET 2019 ला बसले होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात 'National Testing Agency NTA'ने ही प्रवेश परीक्षा घेतली होती. 'NTA NEET 2019 Result'आज 'NTA'च्या वेबसाइटवर पाहता येतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ntaneet.nic.in and mcc.nic.in या वेबसाइटवर लॉग-इन करावं.

या परीक्षेत महाराष्ट्राचा सार्थक भट  695 गुण मिळवून देशात सहावा आला आहे. पहिल्या 10 मध्ये आलेला तो एकमेव महाराष्ट्राचा विद्यार्थी आहे.

देशभरात 5 मे रोजी NEET घेण्यात आली होती. फानी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या ओडिशा आणि कर्नाटकात मात्र 20 मे रोजी NEET परीक्षा घेण्यात आली. यापूर्वीच या प्रवेश परीक्षेची उत्तरं NEET Answer Key 2019 जाहीर करण्यात आली आहेत. त्यावरच्या आक्षेपांना 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. अंतिम निकाल आज लागला.

World Cup : चहलचा 'बॉल ऑफ द सेंच्युरी', 'लगान'च्या कचराची आठवण करून देणारा VIDEO


देशभरातले टॉप 10 रँक होल्डर्स

Loading...

नलिन खंडेलवाल – 701 – राजस्थान

भाविक बन्सल – 700 – दिल्ल

अक्षत कौशिक – 700 – उत्तर प्रदेश

स्वस्तिक भाटिया – 696 – हरियाणा

अनंत जैन – 695 – उत्तर प्रदेश

सार्थक भट – 695 – महाराष्ट्र

माधुरी रेडीज – 695 – तेलंगण

ध्रुव कुशवाह – 695 – उत्तर प्रदेश

मिहिर राय – 695 – दिल्ली

राघव दुबे – 691 – मध्य प्रदेश

NEET Result 2019 कसा बघायचा?

1.प्रथम ntaneet.nic.in किंवा mcc.nic.in या वेबसाइटला भेट द्या.

2.डाउनलोड टॅबमध्ये download NEET Result 2019 जाऊन क्लिक करा.

3.नव्या विंडोमध्ये आवश्यक माहिती भरा. उदाहरणार्थ - आपला आयडी आणि पासवर्ड

4.ही माहिती भरल्यानंतर लगेच तुमचा NTA NEET Result 2019 स्क्रीनवर झळकेल.

आरोग्यसेवा संचालनालयाने दिलेल्या सूचनेनुसार या प्रवेशपरीक्षेची मेरिट लिस्ट काढण्यात येईल. SC, ST विद्यार्थ्यांना किमान 40 गुण अनिवार्य आहेत. इतरांसाठी किमान गुण 50 पर्सेंटाइल असणं बंधनकारक आहे.

SPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीला किती खर्च झाला तुम्हाला माहिती आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...