देवेंद्र फडणवीस पळवणार का बारामतीच्या तोंडचं पाणी ?

देवेंद्र फडणवीस पळवणार का बारामतीच्या तोंडचं पाणी ?

बेकायदेशीरपणे नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे 7 टीएमसी पाणी आता नीरा उजव्या कालव्यातून वाहून हक्काचे पाणी आता फलटण, माळशिरसला जाणार आहे.

  • Share this:

पुणे, 10 जून : विजय सिंह मोहिते आणि रणजित निंबाळकर यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपात घेऊन फडणवीस यांनी माढा सीट जिंकली. आता नीरा देवघर धरणातील बारामतीला 12 वर्षे जाणारे 7 टीएमसी पाणी फलटण, माळशिरसकडे वळवून पवारांच्या तोंडचं पाणी पळवले आहे.

काँग्रेसमधील रणजित निंबाळकर हे गेली अनेक वर्षे नीरा देवघर धरणातील 14 टीएमसी पाणी फलटण आणि माळशिरस तालुक्यातील दुष्काळी भागाला मिळावं म्हणून भांडत होते, आंदोलन करत होते. मात्र अखेर सत्तेत गेल्यावरच हे साध्य होईल हे जाणून निंबाळकरांनी भाजपमध्ये  प्रवेश केला आणि महिनाभरातच त्यांनी बारामतीकरांना झटका दिला.

बेकायदेशीरपणे नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे 7 टीएमसी पाणी आता नीरा उजव्या कालव्यातून वाहून हक्काचे पाणी आता फलटण, माळशिरसला जाणार आहे. याकरता रणजित निंबाळकर यांनी पुण्यात सिंचन भवनला येऊन ठाण मांडलं आहे.

हेही वाचा : 'कठुआ बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी का नाही?'

गेल्याच आठवडयात अजित पावर सिंचन भवनला येऊन गेले तसेच मुंबईत शरद पवार, अजित पवार हेही मुख्यमंत्र्यांना भेटले होते. सोमवारी योगायोगाने सुप्रिया सुळेही सिंचन भवनला आल्या. मात्र, त्यांनी नीरा देवघर पाणी वादाबद्दल आपण अनभिज्ञ आहोत असं उत्तर दिलं.

14 टीएमसी पाणी क्षमता असलेल्या नीर देवघर धरणाचे सर्व पाणी आता फलटण, माळशिरसला मिळणार आहे. त्यामुळे बारामतीला जाणारे 7 टीएमसी पाणी कायमचं बंद होणार आहे. याचे गंभीर राजकीय, सामाजिक, आर्थिक परिणाम होणार आहेत.

या सगळ्या प्रकारामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिते पाटील आणि निंबाळकर यांना हाताशी धरून पवारांना पाणी पाजल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता शरद पवार आणि बारामतीकर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

VIDEO : युतीच्या फाॅर्म्युल्यात आठवलेंची उडी, मागितल्या इतक्या जागा!

 

First published: June 10, 2019, 6:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading