Home /News /news /

हायवेच्या बाजूला वेश्या व्यवसाय, 4 अल्पवयीन मुलींसह 12 पुरुषांना घेतलं ताब्यात

हायवेच्या बाजूला वेश्या व्यवसाय, 4 अल्पवयीन मुलींसह 12 पुरुषांना घेतलं ताब्यात

हायवेच्या बाजूला असलेल्या बांछडा समुदायाची लोकवस्ती आहे. ही लोकं आपल्याच घरातील महिला आणि मुलींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडतात.

    नीमच, 02 जानेवारी : मध्य प्रदेशमधील नीमच जिल्ह्यात पोलीस यांनी एका टोळीचा पदार्फाश केला आहे. रूढी परंपरेच्या नावाखाली हायवेच्या बाजूला वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी छापा टाकून 4 अल्पवयीन मुलींसह 12 महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर घटनास्थळावर 12 ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एका संस्थेनं या वेश्या व्यवसायबद्दल पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांना   मिळालेल्या माहितीनुसार निमचच्या जेतपुरा येथं चार पदरी महामार्गाच्या बाजूला असलेल्या बांछडा समुदायाची लोकवस्ती आहे. ही लोकं आपल्याच घरातील महिला आणि मुलींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडतात. बांछड़ा समुदायाचे लोकं हायवेच्या शेजारी ठिकठिकाणी झोपड्या उभारल्या आहे. जिथे गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता. नीमच पोलीस स्टेशनचे प्रभारी नरेंद्र सिंह ठाकूर यांनी सांगितलं की, एका सामाजिक संस्थेनं याबद्दल आम्हाला माहिती दिली होती. बांछड़ा समुदायातील लोकं हे आपल्या अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलून देतात. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी टीम तयार केल्या आणि जेतपुरा येथील चार पदरी महामार्गावर छापे टाकले. या कारवाईत 12 ग्राहकांना अटक केली. तर घटनास्थळावरून अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलं असून त्यांना चाइल्ड लाइनच्या मदतीने सीडब्ल्युसी काऊंसलिंग साठी पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीमच, मंदसौर आणि रतलाम जिल्ह्यातील चार पदरी महामार्गाच्या शेजारी बांछडा समुदायातील लोकं रूढी आणि परंपराच्या नावाखाली खुलेआम देहविक्री व्यापार करत आहे. यात अल्पवयीन मुलींचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. काही अहवालानुसार, आतापर्यंत 2 हजारांहुन जास्त अल्पवयीन मुलींना महामार्गावर वेश्या व्यवसायात ढकलून देण्यात आलंय.  पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिला आणि  अन्य आरोपींची कसून चौकशी करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी कडक पाऊल उचलली असून परंपरेच्या नावाखाली हा काळा व्यवसाय कायमचा बंद होईल.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या