आता राष्ट्रवादीला रायगडातूनही खिंडार, 'हा' आमदार बांधणार शिवबंधन

आता राष्ट्रवादीला रायगडातूनही खिंडार, 'हा' आमदार बांधणार शिवबंधन

गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी आणि खासदार माजिद मेमन हे मेट्रो भूमिपूजनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.

  • Share this:

मुंबई, 8 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजप आणि सेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादी-काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. आता राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार अवधूत तटकरे हे सोमवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी आणि खासदार माजिद मेमन हे मेट्रो भूमिपूजनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमाला माजिद मेमन उपस्थित राहिल्याने ते देखील भाजपच्या वाटेवर आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.

पक्ष बदलाची चर्चा सुरू होताच माजिद मेमन यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. 'मी पक्ष बदलणार नाही. शरद पवारांचा मी विश्वासू सहकारी त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच नाही,' असा खुलासा माजिद मेमन यांनी केला होता. मेमन यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

हेही वाचा : VIDEO: MIM ने युती तोडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा इम्तियाज जलील यांना टोला

दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांत राष्ट्रवादी सर्वात मोठे धक्के बसले आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.

माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर ही बोलवण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सात गटातील बबनदादा शिंदे समर्थकांची गटनिहाय बैठक आयोजित करण्यात आलं. आमदार बबनदादा शिंदे हेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवल्याने ते आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

SPECIAL REPORT: भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; महापौर, आमदरांनी बदललं जागेचं आरक्षण?

First published: September 8, 2019, 7:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading