फडणवीसांचा डबल अॅटॅक, काँग्रेसनंतर पवारांनाही मोठा धक्का

फडणवीसांचा डबल अॅटॅक, काँग्रेसनंतर पवारांनाही मोठा धक्का

अकलूज इथे 17 एप्रिलला पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. यावेळी विजयसिंह मोहिते यांना भाजप पक्ष प्रवेश करण्यासाठी भाजप नेत्यांचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

  • Share this:

सोलापूर, 08 एप्रिल : काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर आता माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते यांना भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रणजितसिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढ्यात मोठा धक्का बसला होता.

अकलूज इथे 17 एप्रिलाला पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. यावेळी विजयसिंह मोहिते यांनी पक्ष प्रवेश करावा यासाठी भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं समजते. पंतप्रधानांच्या उपस्थितीतच विजयसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे दिग्गज नेते आग्रही आहेत. त्यामुळे आता विखे यांच्यानंतर विजयसिंह मोहिते हे भाजपाचे कमळ मोदींच्या उपस्थितीत हातात घेण्याची शक्यता आहे.

भाजपने विरोधी पक्षनेता फोडला? विखे पाटील मोदींच्या उपस्थितीत 'या' तारखेला करणार प्रवेश!

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे येत्या 12 एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अहमदनगर इथं भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विखेंचा भाजप प्रवेश होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्याची माहीती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित विरोधी पक्षाच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश ही मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची बाब आहे. त्यामुळे येत्या 12 एप्रिलला विखेंच्या भाजप प्रवेशाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं आहे. ही नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे. राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे यांना दक्षिण नगर मतदारसंघातून आघाडीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यानंतर आता वडील राधाकृष्ण विखे हेदेखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

राधाकृष्ण विखेंचा जर भाजपप्रवेश झाला तर काँग्रेससाठी ही मोठी नामुष्की असणार आहे. कारण निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षनेतेपदावर असणाऱ्या व्यक्तीनेच पक्ष सोडल्याने कार्यकर्त्यांपर्यंत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.

नगरमध्ये भाजप Vs राष्ट्रवादी

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अहमदनगर मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली आहे.

सुजय यांनी थेट भाजपचाच झेंडा हातात घेत या मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.

VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

First published: April 8, 2019, 6:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading