Home /News /news /

पडळकर वाद आणखी पेटला, राष्ट्रवादीच्या नेत्याला शिवीगाळ करत धमकीचे फोन

पडळकर वाद आणखी पेटला, राष्ट्रवादीच्या नेत्याला शिवीगाळ करत धमकीचे फोन

पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला तर भाजपनेही पडळकरांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलं. या वादात आता आणखी एक नवा वाद पेटला आहे.

पुणे, 27 जून : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला तर भाजपनेही पडळकरांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलं. या वादात आता आणखी एक नवा वाद पेटला आहे. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांना पडळकर समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर येत आहे. धमकी प्रकरणी पाटील यांनी मोहोळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उमेश पाटील हे सोलापूर झेडपी सदस्य आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पाटील यांनी प्रसारित केलेल्या एका व्हिडीओवरून गोपिचंद पडळकर विरूद्धच्या तिखट प्रतिक्रियेमुळे, गोपिचंद पडळकर आणि त्यांचे समर्थक पाटील यांना धमकीचे फोन करत असल्याची माहिती समोर येत आहे. यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. काय म्हणाले उमेश पाटील? उमेश पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, 'मला फोन करून शिवीगाळ करतात. जीवे मारण्याची धमकी देतात आणि माझ्यासह साहेबांना, दादांना व सुप्रिया ताईंना खूप खालच्या स्तरावर जाऊन आर्वाच्य व घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करतात. आतापर्यंत मला या स्वरूपाचे धमकीचे ३/४ फोन आले. पण मी कोणाच्याही धमक्यांना घाबरणार नाही' गोपीचंद पडळकर यांच्या विखारी टीकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया दरम्यान, पुण्यात खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक संपल्यानंतर माध्यमांकडून शरद पवार यांना गोपीचंद पडळकर यांच्या टीकेविषयी विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार यांनी पडळकरांना थेट उत्तर देण्याचं टाळलं. 'मला बोलायचं आहे...पण आता नाही...लवकरच सविस्तर बोलेन,' असं म्हणत शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर लगेचच प्रतिहल्ला करण्याचं टाळलं. त्यामुळे आगामी काळात शरद पवार पडळकरांच्या टीकेला नेमकं कसं उत्तर देतात, हे पाहावं लागेल. याबाबत 'TV9 मराठी'ने वृत्त दिलं आहे. संपादन - रेणुका धायबर
First published:

Tags: BJP, NCP, Sharad pawar

पुढील बातम्या