माझ्यावर आरोप करण्यासाठी 15 वर्ष लागली का? शरद पवारांचा उदयनराजेंना सवाल

माझ्यावर आरोप करण्यासाठी 15 वर्ष लागली का? शरद पवारांचा उदयनराजेंना सवाल

उदयनराजेंचा हा पक्षत्याग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. नाशिकमधल्या एका कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.

  • Share this:

नाशिक, 16 सप्टेंबर : उदयनराजे भोसले यांनी सातारची खासदारकी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजेंचा हा पक्षत्याग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. नाशिकमधल्या एका कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. उदयनराजे भोसले यांच्याविषयी शरद पवार यांनी प्रश्न विचारला असता मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. पण 15 वर्षानंतर त्यांना आरोप सुचले का? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

रविवारी भाजपच्या साताऱ्यातील महाजनादेश यात्रेमध्ये उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर पक्षातल्या अनेक नेत्यांवर टीका केली होती. उदयनराजे यांचा स्वत:चा एक चाहता वर्ग आहे. त्यांना मानणारा एक वर्ग सर्व राज्यात आहे. त्यामुळे त्यांचं भाजपमध्ये जाणं राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का होतं. त्यामुळे पवार यांनी शिवाजी महाराजांचं उदाहरण देत उदयनराजेंना जोरदार टोला हाणला होता. 'छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी ते गेले देखील. परंतु खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वतः हिंदवी स्वराज्य निर्माण केलं.' असं ट्वीट रविवारी शरद पवार यांनी केलं होतं.

महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांमधून पुन्हा नवा महाराष्ट्र आपण घडवू या. महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री पाच वर्षांमध्ये आपण काय केलं हे न सांगता केवळ विरोधकांची निंदा-नालस्ती करण्यातच धन्यता मानत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादीवर काय म्हणाले उदयराजे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार संध्याकाळी साताऱ्यात आली. माजी खासदार आणि ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला ते उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचं स्वागत केलं. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. गेल्या 15 वर्षात आघाडी सरकारने माझं एकही काम केलं नाही. सगळे प्रस्ताव अडवून ठेवले. माझ्या प्रत्येक गोष्टींवर त्यांनी फुलीच मारली. मात्र गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी अनेक कामं मार्गी लावली असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली.

इतर बातम्या - राजू शेट्टींचा गनिमी कावा.. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

दरम्यान, यावेळी बोलताना मनसेला आघाडीत जागा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुकांवर बहिष्कार घाला ही राज ठाकरे यांची भूमिका आहे ती आघाडीला मान्य नसल्यामुळे मनसे आघाडीत नसणार असं शरद पवार म्हणाले आहेत. मनसेचं मात्र निवडणूक लढवायची की नाही, हे अजून ठरलं नाही आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे निवडणूक लढण्यासंदर्भात उत्साही नाहीत. त्यामुळे निर्णय होत नसल्याने पदाधिकारी अस्वस्थ आहेत, असंही सांगण्यात येत आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याशी संपर्क केला असता, राज ठाकरे पक्षहिताचाच निर्णय घेतील, असं ते म्हणाले. पण थेट प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

इतर बातम्या - विधानसभेत चुरस वाढणार.. संभाजी ब्रिगेडने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी

आगामी विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये तयारीला सुरुवात झाली आहे. आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागा लढवणार आहेत. तर उर्वरित 38 जागा मित्रपक्षांसाठी सोडणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडमध्ये याची घोषणा केली. जर 38 मधून काही जागा उरल्या तर त्या आम्ही वाटून घेऊ, असंही ते म्हणाले.

बेशिस्तपणाच्या आरोपावर उदयनराजेंचं कॉलर स्टाईल उत्तर, पाहा VIDEO

First published: September 16, 2019, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading