राजेंना मी गाडी-बंगला द्यायला तयार पण...; पवारांचा उदयनराजेंना टोला!

राजेंना मी गाडी-बंगला द्यायला तयार पण...;  पवारांचा उदयनराजेंना टोला!

उदयनराजे गहिवरले असा प्रश्न विचारला असता 'त्यांच्या मानसिक स्थितीत मी भर टाकू इच्छित नाही. पण त्यांना दिल्लीतील गाडी आणि बंगला पाहिजे आहे. मी तो द्यायला तयार आहे' असं शरद पवार म्हणाले आहे. त्यांच्या या उत्तरामुळे एकच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  • Share this:

पुणे, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही माहिती नव्हती, असा मोठा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांच्याविषयीदेखील वक्तव्य केलं आहे. उदयनराजे गहिवरले असा प्रश्न विचारला असता 'त्यांच्या मानसिक स्थितीत मी भर टाकू इच्छित नाही. पण त्यांना दिल्लीतील गाडी आणि बंगला पाहिजे आहे. मी तो द्यायला तयार आहे' असं शरद पवार म्हणाले आहे. त्यांच्या या उत्तरामुळे एकच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

'उदयनराजेंना दिल्लीतील गाडी, बंगला हवा आहे. तो मी देण्यासाठी तयार आहे. पण त्यांनी दिवसा बंगल्यावर यावं' असंही शरद पवार म्हणाले आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांआधीच सातारा दौरा केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले हे शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भावुक झाले होते. तसंच यावेळी उदयनराजे यांना अश्रूही अनावर झाले होते .

'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी अर्ज दाखल केला तर मी ही निवडणूक लढवणार नाही. मला शरद पवार यांच्याबद्दल खूप आदर आजही आहे,' असे भावुक उद्गार यावेळी उदयनराजेंनी काढले होते. उदयनराजे भावनिक झाल्याने सर्वच संभ्रमात पडल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरच शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उदयनराजेंना टोला मारला आहे. त्यावर आता उदयनराजे काय उत्तर देणार याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.

अजित पवार यांच्या राजीनाम्याविषयी काय म्हणाले शरद पवार?

या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, आज दुपारी बैठका सुरू असताना राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाच्या नेते अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांनी आमच्या कुणाशीही चर्चा केली नव्हती. मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क केला तर त्यांनी दिलेलं कारण समजलं. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी माझ्या नावाचा समावेश करण्यात आला. त्यामुळे अजित पवार हे अस्वस्थ होते. राज्यातील राजकारणाची पातळी खालावली आहे. यातून बाहेर पडावं असा सल्लाही त्यांनी आपल्या मुलाला दिला होता, असंही पवारांनी सांगितलं. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे अजित पवार नाराज झाले होते. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर चर्चा करेन, असंही पवार म्हणाले.

इतर बातम्या - समुद्राचा VIDEO शूट करणाऱ्या मुलीच्या कॅमेऱ्यात कैद झाला वडिलांचा मृत्यू

दरम्यान, शिखर बँक प्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी उत्तर देण्यासाठी आज ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल 24 तारखेला मी जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज गेलो होता. परंतु, काल संध्याकाळी ईडीच्या संचालकांनी मला न येण्याची विनंती केली होती. परंतु, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मला तिथे जाऊन आपली भूमिका मांडावी अशी विनंती केली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी मला दोन वेळा विनंती केली की, कायदा सुवव्यस्थेची परिस्थिती विपरीत होऊ नये, म्हणून त्यांनी विनंती केली. त्यामुळे तिचा स्वीकार केला आणि ईडी कार्यालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही, अशी माहितीही पवारांनी दिली.

इतर बातम्या - शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर पार्थ यांचं भावनिक टि्वट, म्हणाले...

उदयनराजेंचा गड भेदण्यासाठी पवार मैदानात

उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. ताकद दाखविण्यासाठी राष्ट्रवादीने सगळा जोर लावला होता. अनेक दिग्गज साताऱ्यात दाखल झाले होते. शहरातून रॅली काढून पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आपल्या भाषणात पवार नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणच पवारांनी उदयनराजेंतं नाव न घेतला त्यांच्यावर सडकून टीका केली आणि विधानसभा निवडणुकीत घरा घरात घड्याळ पोहोचवा असा आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला होता.

इतर बातम्या - उदयनराजेंना शह देण्यासाठी 'या' तीन नावांचा विचार, शरद पवारांच्या वक्तव्याने नवी

'पूर्वी बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा राजा होता आणि आज टीव्हीवर पाहिलं कोणी कोणाला पगडी घातली ते. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा कधी चुकीचा रस्ता धरणार नाही. असं करणार्‍यांना आम्ही रस्ता दाखविणार आहोत,' असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला होता.

अजितदादांचा राजीनामा कुटुंब कलहातून? शरद पवारांची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 07:12 AM IST

ताज्या बातम्या