भाजप अध्यक्षांवर पवारांची घणाघाती टीका, म्हणाले '5 वर्षांपूर्वी अमित शहा...'

भाजप अध्यक्षांवर पवारांची घणाघाती टीका, म्हणाले '5 वर्षांपूर्वी अमित शहा...'

महाराष्ट्रात आम्ही काय केलं हे आगोदर माहिती करून घ्या' असा टोला शरद पवार यांनी अमित शहा यांना लगावला आहे.

  • Share this:

बीड, 13 ऑक्टोबर : अमित शहा म्हणातात की शरद पवार यांनी महाराष्ट्रात काय केलं. महाराष्ट्रात काय केलं हे विचारण्याचा अधिकार अमित शहा तुम्हाला नाही, हा महाराष्ट्राच्या जनतेला आहे. पाच वर्षापूर्वी अमित शहाचे नाव महाराष्ट्रालाही माहित नव्हतं अशा शब्दात शरद पवार यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. 'रोजगार हमीचा पहिला कायदा महाराष्ट्रात केला तेव्हा मी मुख्यंमत्री होतो. महिलांना आरक्षण आम्ही दिलं. मंडळ आयोग, ओबीसीला कायदा करण्याचा पहिला कायदा केला तेव्हा आम्ही सत्तेत होतो. म्हणून महाराष्ट्रात आम्ही काय केलं हे आगोदर माहिती करून घ्या' असा टोला शरद पवार यांनी अमित शहा यांना लगावला आहे.

शिवाजी महाराजांचे जगातील एकमेव स्मारक करू पण अद्याप एक विटही उभारण्यात आलेली नाही. काम शून्य! इंदुमिलमधील बाबा साहेबांचे आंतराष्ट्रीय पातळीवरील स्मारक करू. पण इथे पण इंचभर काम केलेलं नाही. शिवाजी महाराजांनी गडकिल्ले हे रक्त सांडून, लढाया करून मिळवले पण भाजपा-शिवसेनेचं सरकार आल्यापासून या सगळ्या किल्यांवर हॉटेलला परवानी देऊन पर्यटन विकासा करणार आहेत. ज्या किल्यांवर लढाई होतं होती. शौर्याच दर्शन होतं होतं, तिथे आजचे राज्यकर्ते छमछम आणू पाहत आहेत? अशा शब्दात शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप, राष्ट्रवादीवर कठोर शब्दात टीका केली आहे.

महाराष्ट्रात 16 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. शेतीला विज, पाणी नाही. दुष्काळी समस्या आहेत. आणि मुख्यमंत्री सांगतात आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 50 हजार कोटी दिले. कुणाला काही कोटी मिळाले का ? काही मिळालं नाही. जर हे पैसे खर्च झाले असते तर 16 हजार शेतकऱ्यांनी जिव दिला नसता. म्हणून परिवर्तन करायचं यासाठी तरुणांच्या हातात सत्ता देत आहे. त्यांच्याकडे सूत्र देत आहे. असं सांगत गेवराई आणि बीडचे तरुण उमदेवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा. त्यांना साथ द्या असं आवाहन यावेळी पवारांनी केलं आहे.

इतर बातम्या - सेनेच्या वचननाम्यावर ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा छाप, हे आहे घोषवाक्य!

उद्योग बंद झाले रोजगार नाही बेरोजगारी आली हे प्रश्न आहेत. लोकांच्या हातातील रोजगार काढून घेणाऱ्यांच्या हातात ही सत्ता द्यायची नाही हा निर्धार आता सामान्य लोकांनी केला पाहिजे असें पवार म्हणाले. त्यासाठी या उमेदवारांना विजयी करा. काही प्रश्न आला की कलम 370 सांगतात. महाराष्ट्राला त्या गोष्टीचा फायदा नाही. ते त्यांचा प्रचार करत आहेत. सरकार शब्द देत नाही सत्तेचा गैरवापर करत आहेत. यात चिदंबरम सत्ताधारी पक्षाविरोधात बोलत होते पण त्यांना आत टाकलं. कर्नाटकात भाजपा विरोधात बोलनाऱ्या उपमुख्यमंत्री यांना जेलमध्ये टाकलं. विरोधकांना काही कारण नसताना आतमध्ये टाकलं जात आहे. माझ्यावर पण आरोप नसताना ईडीची नोटीस पाठवली पण आम्ही असल्या ईडी-फीडीला  घाबरत नाही असं शरद पवार म्हणाले आहेत.

इतर बातम्या - निवडणूक आयोगाने नांदेडमध्ये 12 व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनला पाठवल्या नोटीसा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2019 07:23 AM IST

ताज्या बातम्या