मोदींना बोट दिलं तर ही अवस्था, हात दिला तर... - शरद पवार

मोदींना बोट दिलं तर ही अवस्था, हात दिला तर... - शरद पवार

आजपर्यंत आरबीआयमध्ये कोणत्याही सरकारने हस्तक्षेप केला नाही. पण मोदी सरकारने आरबीआयमध्ये हस्तक्षेप केल्याने आरबीआयचे रघुराम राजन व उर्जित पटेल राजीनामा दिला.

  • Share this:

अमरावती, 08 एप्रिल :  नरेंद्र मोदी हे देशावर आलेले संकट नसून राष्ट्रीय आपत्ती आहे, ही आपत्ती घालवणे गरजेचे आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडीच्या उमेदवार नवनीत रवी राणा यांच्या प्रचारात अमरावती येथे केले.

आजपर्यंत आरबीआयमध्ये कोणत्याही सरकारने हस्तक्षेप केला नाही. पण मोदी सरकारने आरबीआयमध्ये हस्तक्षेप केल्याने आरबीआयचे रघुराम राजन व उर्जित पटेल राजीनामा दिला. काँग्रेसने 70 वर्षात काहीच नाही केले असे म्हणणाऱ्या मोदींनी तुम्ही 5 वर्षात काय दिवे लावले हे सांगावे, असा सवाल ही पवारांनी विचारला.

मोदी नेहमी 56 इंचची छाती आहे म्हणतात मग गेल्या दोन वर्षांपासून कुलभूषण जाधव  यांना सोडून का आणले नाही? तेव्हा कुठे गेली तुमची 56 इंच ची छाती असा, सवाल यावेळी शरद पवार यांनी केला.  मोदी म्हणतात की मी पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, बोट दिल तर ही अवस्था आहे, हात दिला तर काय करेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

'निवडणुका आल्या की मोदी अंगात आल्यासारखं करतात'

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यामध्येदेखील त्यांनी मोदींवर टीका केली. दौंड तालुक्यातील पाटस इथं झालेल्या या मेळाव्यात शरद पवारांनी मोदींवर कडाडून टीका केली. नरेंद्र मोदी इतरवेळी ठीकठाक असतात. पण निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं,' असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला होता.

'जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा', शरद पवारांनी घातली साद

जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना साथ देण्याचं आवाहन केलं. शरद पवार यांनी आपल्या या विधानातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर इथं अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

'मोदींच्या सभेचा फायदाच'

'गेल्या विधानसभेला नरेंद्र मोदींनी बारामतीत सभा घेतली आणि अजित दादा 1 लाख मतांनी निवडून आले. त्याआधी ते 60 ते 65 हजारांनी निवडून यायचे. आतादेखील नरेंद्र मोदी बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. मला चिंता नाही. उलट आता आमचा उमेदवार लाखांच्या फरकाने निवडून येणार,' असं म्हणत शरद पवार यांनी मोदींच्या संभाव्य बारामती दौऱ्याची खिल्ली उडवली.

VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

First published: April 8, 2019, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading