आगे आगे देखिए होता है क्या, संजय राऊतांच्या 'त्या' ट्ववीटला काँग्रेसचं उत्तर!

आगे आगे देखिए होता है क्या, संजय राऊतांच्या 'त्या' ट्ववीटला काँग्रेसचं उत्तर!

आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून भाजवर टीका केली तर त्यावर उत्तर देत आता काँग्रेस नेते नवाब मलिक यांनीही एक ट्वीट केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : एकीकडे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना आणि आघाडी प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून भाजवर टीका केली तर त्यावर उत्तर देत आता काँग्रेस नेते नवाब मलिक यांनीही एक ट्वीट केलं आहे.

संजय राऊत यांनी प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांची शायरी शेअर करत भाजपर निशाणा साधला. 'यारों नए मौसम ने ये एहसान किया है. याद मुझे दर्द पुराने नहीं आते.' असं म्हणत त्यांनी ट्वीट केलं तर त्यावर 'इब्तेदाए इश्क़ है रोता है क्या, आगे आगे देखिए होता है क्या' अशी शायरी करत नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. या दोघांच्या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

निवडणुकीआधी भाजप-सेना यांच्यात युती झाली होती. पण एकत्र निवडणुका लढलेल्या भाजप-सेनेमध्ये निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून मतभेद झाले. अखेर भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. दरम्यान, निकालापासून संजय राऊत यांनी भाजपवर सातत्याने हल्लाबोल केला आहे. त्यांनी फक्त जे ठरलं ते करा एवढंच सांगत मुख्यमंत्रिपदावर ठाम भूमिका घेतली. शेवटी यावर काहीच तोडगा न निघाल्याने सेनेनं रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

इतर बातम्या - सत्ता स्थापनेचा संभ्रम वाढला, महाशिवआघाडीने राज्यपालांची भेट पुढे ढकलली

भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनाही सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रण दिलं होतं. मात्र, त्यांना पुरेसं संख्याबळ नसल्यानं दावा करता आला नाही. अखेर राज्यपालांनी केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दुसरीकडे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरू आहे. ही चर्चा अखेरच्या टप्प्यात आल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

इतर बातम्या - सत्तासंघर्ष सुरू असताना भाजपचा 'प्लान बी', पक्षाचं लक्ष आता स्थानिक निवडणुकांवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...