Home /News /news /

सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा

सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच सुप्रिया सुळे यांनी माईक हातात घेत परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी प्रयत्न केले.

औरंगाबाद 21 फेब्रुवारी : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिय सुळे यांच्या कार्यक्रमातच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमधला विसंवाद उघड झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण इथे ही घटना घडली. दोन नेत्यांचे कार्यकर्ते सभा सुरु असतानाच एकमेकांमध्ये भिडले. शेवटी सुप्रिया सुळे यांनी हस्तक्षेप करत वाद शांत केला. दत्ता गोर्डे आणि संजय वाकचौरे या स्थानिक नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी हा राडा केला. स्थानिक राजकारण आणि वर्चस्वाच्या भावनेतून हा वाद उफाळल्याचं सांगण्यात येतेय. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सुप्रिया सुळे या सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या भेटीवर आहेत. त्याचसाठी त्यांचा पैठणला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरु होताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. नेमकं काय झालं हे सुप्रिया सुळेंना कळालं नाही. घोषणा देणारे कार्यक्रर्ते झाले आणि मुद्यांवरून कार्यक्रम गुद्यावर आले. हाणामारीलाही सुरुवात झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच सुप्रिया सुळे यांनी माईक हातात घेत परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी एका नेत्याने त्यांना नेमकं काय झालं, कुठले कार्यकर्ते आहेत ते सांगितलं. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला डावलून बोर्डेंना तिकीट देण्यात आलं असा वाकचौरे यांचा आरोप आहे.

ठाकरे सरकारला मोठा धक्का, राज्यपालांनी फेटाळली महत्त्वाची शिफारस

त्यामुळे स्थानिक वर्चस्वाचा वाद निर्माण झाला होता. सुप्रिया सुळे यांनी दोनही गटांना शांत कर प्रत्येकाळी वेगळी चर्चा केली आणि शेवटी प्रकरण शांत झालं. हेही वाचा... सरकारचा मोठा निर्णय, भरतीसाठी महापोर्टल बंद करून नव्या संस्थेची निवड करणार

गंमत कराल तर जंमतच करून टाकेल, अजितदादांनी उपटले कार्यकर्त्यांचे कान, VIDEO

Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Supriya sule

पुढील बातम्या