महाराष्ट्राच्या राजकारणातील नवं पर्व, रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंना फोन आणि...

रोहित पवार यांच्यासंबंधी महाराष्ट्राच्या राजकारणातील आगळावेगळाक्षण पाहण्यास मिळाला.

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 04:02 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणातील नवं पर्व, रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंना फोन आणि...

मुंबई, 25 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी फोनवरून शुभेच्छा आहेत. हे दोघांनीही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती. आदित्य ठाकरे यांनीही यावेळी रोहित पवारांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील नवी पिढी त्यांची राजकिय संस्कृती यातून भविष्यात महाराष्ट्रातील सक्षम राजकारण दिसून आलं. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या सांगण्यावरून रोहित पवारांनी आदित्य ठाकरे यांना फोन केला असल्याची माहिती आहे.

खरंतर रोहित पवार यांच्यासंबंधी महाराष्ट्राच्या राजकारणातील आगळावेगळाक्षण पाहण्यास मिळाला. कर्जत जामखेडमधीलभाजपचे पराभूत मंञी राम शिंदे यांनी विजयी उमेदवार रोहित पवार यांचा फेटा बांधून सत्कार केला. रोहित यांनी राम शिंदेंच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी रोहित यांनी राम शिंदे यांच्या आईचे आशीर्वाद घेऊन राजकारणातील सुसंस्कृतपणा दाखवून दिला.

तर तिकडे वरळीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समर्थनात ठिकठिकाणी पोस्टर झळकले आहेत. पोस्टरवर आदित्य यांच्या फोटोसोबतच शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. 'शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांनी विजयाच्या हार्दिक शुभेच्छा...' असा संदेश पोस्टर लिहिला आहे.

रोहित यांना विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष

राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी मतमोजणीत आघाडी घेतली आणि अखेर ती विजयात रुपांतरीत झाली. रोहित पवार यांचा सामना थेट भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात होता. त्यामुळे रोहित काय करिष्मा करून दाखवतील याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर, निकालाअंती रोहित यांना 135824 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 92477 मतं मिळाली. रोहित यांना विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Loading...

दरम्यान, जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांची मिरवणूक आणि जल्लोष हा जनतेचा विजय असून येणाऱ्या काळामध्ये या भागातील प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल महाराष्ट्रात आकडेवारी कमी असली तरी शेवटी शरद पवार पुढील निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

'प्रत्येकवेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही'

निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले. मात्र, आभार मानतानाच भाजपलाही त्यांनी टोलाही लगावला. सत्ता येते आणि जातेही, पण सत्तेची नशा कोणाच्या डोक्यात शिरली तर जनता ती उतरवते, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरलेल्या 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्याची आठवणही करून दिली. दोनही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्र बसतील. पारदर्शकपणे चर्चा करतील आणि तोडगा काढतील असेही त्यांनी सांगितले. आधी सत्तेचे वाटप ठरेल नंतरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले. हा भाजपला इशारा नसून लोकसभेच्या वेळी जे ठरले त्याची फक्त आठवण करून देतो, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, कुणाही एका व्यक्ती किंवा पक्षाभोवती प्रचार केंद्रीत राहू नये. जनतेनं अत्यंत जागरूकपणे मतदान केलंय. त्यांनी विरोधी पक्ष जिवंत ठेवलाय. काही जण गृहीत धरून चालतात त्यांनाही जनतेनं योग्य तो संदेश दिलाय असा टोलाही त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लगावला. सत्ता स्थापनेही मला घाई नाही असंही त्यांनी सांगितलंय. भाजपने जागावाटपावेळी अडचण आहे म्हणून सांगितलं. मात्र प्रत्येकवेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले. गरज पडली तर अमित शहाही चर्चेला येतील असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...