Home /News /news /

रोहित पवार भडकले, ‘भाजपला कोरोनाशी नाही फक्त राजकारणाशी देणं घेणं’

रोहित पवार भडकले, ‘भाजपला कोरोनाशी नाही फक्त राजकारणाशी देणं घेणं’

ठाकरे हे सध्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत एका सहभागृहाचं सदस्यत्व मिळवणं आवश्यक आहे.

  मुंबई 21 एप्रिल: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार भाजपवर भडकले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभं राहत त्यांनी भाजपवर पलटवार केला आहे. अवघा महाराष्ट्र कोरोनाशी लढतोय. सगळी जनता चिंताग्रस्त आहे. अशी अवघड परिस्थिती असताना भाजपचे नेते राजकारण करत आहेत अशी कठोर टीका त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करावी अशी शिफारस कॅबिनेटने राज्यपालांना केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यावर कायदेतज्ज्ञांचं मत घेत आहेत. राज्यापालांच्या निर्णयाला विलंब लागत असल्याने सत्ताधारी पक्षांनी राज्यपालांवर टीका केलीय. कोरोनामुळे विधान परिषदेची निवडणूक शक्य नसल्याने मंत्रिमंडळाने ही शिफारस केली होती. ठाकरे हे सध्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत एका सहभागृहाचं सदस्यत्व मिळवणं आवश्यक आहे. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली. या सगळ्या घडामोडींवरून त्यांनी भाजपवर टीका केलीय. मंत्रिमंडळाच्या या शिफारसीला काही लोकांनी कोर्टात आव्हानही दिलं होतं. मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळत यावर राज्यपालांनीच निर्णय घ्यावा असं मत व्यक्त केलं होतं. या याचिकाही भाजपच्याच नेत्यांच्या इशाऱ्याने टाकण्यात आल्याची टीकाही रोहित पवार यांनी केली आहे. दुबईमध्ये अडकलेल्या सोनू निगमच्या अटकेची मागणी,'अजान'बाबत वादग्रस्त ट्वीट VIRAL राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच पालघरमध्ये झालेल्या दोन साधूंच्या हत्या प्रकरणानंतर महाष्ट्रातील वातावरण तापलं होतं. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाचं संकट आणि पालघर हत्याकांड या दोन्ही विषयांवर राज्यपालांशी चर्चा केली असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीत उद्धव ठाकरे यांच्या नेमणुकीविषयी काही चर्चा झाली का, याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की आपण उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या नेमणुकीविषयी सामंजस्याची भूमिका घ्यावी.

  वृत्तपत्रांचं आणि अत्यावश्यक सामानाचं घरोघरी वितरण : सरकारने बदलला नियम

  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमक शब्दांमध्ये अप्रत्यक्षपणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला होता. 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.
  First published:

  Tags: BJP, Rohit pawar

  पुढील बातम्या