Home /News /news /

तुमच्या पक्षाचा झेंडा नाही, राष्ट्रध्वज आहे; भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये शाब्दिक चकमक

तुमच्या पक्षाचा झेंडा नाही, राष्ट्रध्वज आहे; भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये शाब्दिक चकमक

आमदार प्रकाश गजभिये यांनी राष्ट्रध्वज विधान भवनात तिरंगा गुंळाडून ठेवण्यावर सुजित सिंह ठाकूर भडकले.

मुंबई,24 फेब्रुवारी:विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकारचे पहिले बजेट सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन केले. सर्व आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान सत्तेत असूनही राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी काळे कपडे परिधान करून विधानभवनात प्रवेश केला. प्रकाश गजभिये यांनी सीएए, एनआरसीला विरोध दर्शवणारे फलक दाखवून त्यांनी निषेध केला. यादरम्यान, भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर आणि प्रकाश गजभिये यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. आमदार प्रकाश गजभिये यांनी राष्ट्रध्वज विधान भवनात तिरंगा गुंळाडून ठेवण्यावर सुजितसिंह ठाकूर भडकले. सुजितसिंह ठाकूर यांनी प्रकाश गजभिये यांना फटकारले. प्रकाश गजभिये यांनी सीएए, एनआरसी विरोध करण्यासाठी तिरंगा ध्वज हातात घेऊन काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये विधानभवनात आले होते. आमदार गडभिये वारंवार हातातील झेंडा गुंडाळून ठेवत त्याचा अपमान करत होते. त्यावरून सुजित सिंहठाकूर यांनी गजभिये यांना चांगलेच फटकारले. झेंडाचा अपमान करू नका, असा त्यांना दमच दिला. तुमच्या पक्षाचा झेंडा नाही, राष्ट्रध्वज आहे. त्याची काळजी घ्या, असा सल्ला सुजितसिंह ठाकूर यांनी त्यांना दिला. Namaste Trump Live: इस्लामिक दहशतवादाचा जगाला धोका - ट्रम्प दरम्यान, प्रकाश गजभिये आपल्या वेगवेगळ्या वेशभूषांच्या माध्यमातून सरकारी धोरणांचा निषेध करण्यासाठी प्रत्येक अधिवेशनामध्ये चर्चा घडवून आणतात. या वेळी तर सत्ताधारी असून देखील त्यांनी काळे कपडे परिधान करून त्यांनी विधान भवनात प्रवेश केला. सीएए, एनआरसीविरोधात फलक दाखवून त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. आम्ही जाब विचारणारच.. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं. या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार हे आपलं पहिलं बजेट सादर करणार आहेत. सरकारला तीन महिने झाले आता आम्ही त्यांना जाब विचारणार असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या नेतृत्वात भाजपच्या आमदारांनी आंदोलन केले. सर्व आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली. ट्रम्प उतरणारं दिल्लीतील हॉटेल पाहाल तर थक्क व्हाल, एका रात्रीचं भाडं तब्बल... कामकाजाला सुरुवात होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला तर अर्थमंत्री अजित पवार यांनी सुधारणा अध्यादेश मांडला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला तर भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. फडणवीस म्हणाले, सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाहीये. केवळ 20 हजार जणांची यादी देणार आहे अशी फसवी घोषणा आहे. शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार सुरु आहे. रोज महिलांवर अत्याचार सुरुच आहेत. त्या संदर्भात सरकारची संवेदनशीलता दिसत नाहीये. आम्ही हे विषय आज सभागृहात उपस्थित करणार आहोत. महाविकास आघाडी सरकारचे नेत्यांची सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक दरम्यान, महाविकास आघाडीचीही महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजित पवार यासह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यात अधिवेशनाचं कामकाज आणि महाविकास आघाडी अजेंडा यावर चर्चा होणार आहे. धनंजय मुंडे म्हणाले, अर्थसंकल्प मधून मोठा दिलासा मिळेल. भाजपने सत्तेत असताना शेतकरी फसवणूक केली. फडणवीस यांची कर्जमाफी भीक नको कुत्रा आवर अशीच राहिली होती. त्याचा पर्दाफाश करणार आहोत.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या