अवधूत तटकरेंचा कार्यकर्त्यांसह सेनेत प्रवेश, राष्ट्रवादी सोडली कारण...!

अवधूत तटकरेंचा कार्यकर्त्यांसह सेनेत प्रवेश, राष्ट्रवादी सोडली कारण...!

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अवधुत तटकरे यांनी मातोश्रीवर आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

  • Share this:

मुंबई, 09 सप्टेंबर : महाराष्ट्रात आणखी एका पुतण्याची बंडखोरी पाहायला मिळाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरेंचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे रायगडात राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अवधुत तटकरे यांनी मातोश्रीवर आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

'गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांशी पक्षबदलाबाबत चर्चा सुरू होती. अजितदादा पवार यांच्याशी एकदा चर्चा झाली होती. माझ्या व्यथा मी त्यांच्याकडे मांडल्या होत्या. पण मी पक्षबदलाच्या निर्णयापर्यंत पोहचलो होतो. मी कोणावरही नाराज नाही. राजकीय महत्वकांक्षा काहीशी आहेच. मला तिकीट मिळणार म्हणून मी पक्षात आलेलो नाही. तर काकांशी पक्षबदलाबाबत काहीही बोलणं झालेलं नाही.' अशी प्रतिक्रिया अवधूत तटकरे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीची अडचण, शरद पवारांच्या कट्टर समर्थकाचा मुलगा करणार शिवसेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात अनेक धक्के बसले. त्यानंतर आता विदर्भातही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरू झालं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित दोन दिवसात समीर देशमुख यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले समीर देशमुख हे सहकार महर्षी आणि माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव आहेत. प्रा. सुरेश देशमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुलगाच आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याने पक्षाला चांगलाच धक्का बसला आहे.

इतर बातम्या - अबब! हम दो हमारे...या लंकाबाई आहेत 21व्या वेळी गर्भवती

दरम्यान, विविध जिल्ह्यांमध्ये पडझड होत असताना आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. काँग्रेससोबत आघाडीचा फॉर्म्युला लवकरात लवकर निश्चित करून युतीसमोर आव्हान निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीचे सात उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे.

इतर बातम्या - क्षणात तुटली साता जन्माची गाठ, पतीला उचलण्यासाठी हात देताच डंपरनं चिरडलं!

असा आहे युतीचा फॉर्मुला...

युतीच्या जागावाटपात घटक पक्षांना 18 जागा मिळणार आहेत. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ही माहिती दिली आहे. 18 पैकी 12 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळणार आहेत. त्यामुळे, भाजप आणि शिवसेनेत आता 270 जागांवर चर्चा सुरू आहे. न्यूज18 लोकमतनं काही दिवसांपूर्वीच ही माहिती दिली होती. आता जानकरांनी माहिती दिल्यामुळं न्यूज18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे.

इतर बातम्या - पुरोगामी महाराष्ट्रातील ऐतिहासिक घटना, 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा!

जागावाटपाबाबत सोमवारी भाजप आणि शिवसेनेत बैठक झाली. या बैठकीत भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन होते तर शिवसेनेकडून सुभाष देसाई होते. या बैठकीत काही जागांच्या अदला-बदलीबाबत चर्चा झाली. पण, चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. अनंत चतुर्दशीआधीही युतीचा फॉर्म्युला ठरू शकतो, त्याची शक्यता नाकारता येत नाही.

VIDEO : राज्याच्या राजकारणात आणखी एका पुतण्याची बंडखोरी, सेनेचा झेंडा घेतला हाती!

Published by: Renuka Dhaybar
First published: September 9, 2019, 7:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading