राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण, शरद पवारांच्या बैठकीत होते हजर

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण, शरद पवारांच्या बैठकीत होते हजर

काही दिवसांपूर्वी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतली होती.

  • Share this:

किरण मोहिते, प्रतिनिधी

सातारा, 15 ऑगस्ट : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सेलिब्रिटींपासून ते अन्य राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे सहकार मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थितीत होते.

सातारा जिल्ह्याभोवती कोरोनाचा वाढता विळखा लक्षात घेता येथील यंत्रणेवर दिवसागणिक ताण हा वाढताना दिसत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे या परिस्थितीत सगळ्या यंत्रणेवर लक्ष ठेऊन यातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली   आहे.

स्वातंत्र्य दिनी साताऱ्यात खळबळजनक घटना, पोलिसांमुळे अनर्थ टळला

बाळासाहेब पाटील यांना कराडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरू करण्यात आले आहेत.

पाटील यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्यात आली आहे. तसंच जर कुणी संपर्कात आले असेल, त्यांनी क्वारंटाइन व्हावे किंवा समोर येऊन माहिती द्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे.

धक्कादायक म्हणजे,  काही दिवसांपूर्वी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी या बैठकीला बाळासाहेब पाटील सुद्धा हजर होते. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी, शासकीय अधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण, पाहा हे PHOTOS

त्यामुळे बाळासाहेब पाटील यांच्या संपर्कात आलेल्या शरद पवारांसह अनेक महत्वाच्या नेत्यांची यामुळे चिंता वाढली आहे.

याआधीही राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. तसंच अशोक चव्हाण, संजय बनसोडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

Published by: sachin Salve
First published: August 15, 2020, 10:29 AM IST
Tags:

ताज्या बातम्या