मतदानाच्या 3 दिवस आधी राष्ट्रवादीला धक्का, कार्यकर्त्यांचा भाजप बंडखोर उमेदवाराला पाठिंबा

मतदानाच्या 3 दिवस आधी राष्ट्रवादीला धक्का, कार्यकर्त्यांचा भाजप बंडखोर उमेदवाराला पाठिंबा

कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

चंदगड (कोल्हापूर), 17 ऑक्टोबर : मतदानाला अवघे तीन दिवस राहिले असतानाच अनेक मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात एका महत्त्वाच्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली आहे. चंदगडमधून काँग्रेस आघाडीकडून राजेश पाटील रिंगणात आहेत तर महायुतीकडून संग्राम कुपेकर हे रिंगणात आहेत.

या दोघांविरोधात भाजप समर्थक आणि बंडखोर अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. तीन दिवस मतदानाला राहिलेले असताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम जे पाटील यांनी शिवाजी पाटील यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर शिवाजी पाटील यांनी 'एकला चलो रे'चा नारा देत कुठल्याही नेत्याशिवाय गावागावांमध्ये पदयात्रा आणि प्रचारावर भर दिला आहे.

दरम्यान, निवडणूक घोषणेआधी आऊटगोईंगने हैराण झालेल्या राष्ट्रवादीचे धक्के काही थांबत नाही आहेत. राष्ट्रवादीचे विधान परिषदचे आमदार रामराव वडकुते यांनीही राजीनामा दिला. विधान परिषदेच्या सभापतींकडे वडकुते यांनी आपला राजीनामा सोपवला. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रामराव वडकुते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. धनगर समाजातील नेते म्हणून वडकुते यांची ओळख आहे.

इतर बातम्या - सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत काय म्हणाले अमित शहा, वाचा EXCLUSIVE रिपोर्ट

निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेताना पाहायला मिळतात. तिकीट न मिळाल्यानेच राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. रामराव वडकुते हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र संधी न मिळाल्याने वडकुते हे पक्षावर नाराज होते. आता अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंगोल मतदारसंघात वडकुतेंमुळे आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटानंतर पवारांची प्रतिक्रिया

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होत असून 24 ऑक्टोबरला मतमोजनी होईल. त्यामुळे आता महाराष्ट्राची सत्ता कोण काबीज करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आघाडीला चितपट करत सत्ता राखण्याचं महायुतीसमोर आव्हान असणार आहे, तर युतीला धक्का देत राजकीय कमबॅक करण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.

इतर बातम्या - EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य

Published by: Renuka Dhaybar
First published: October 17, 2019, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading