'भाजपचं काँग्रेसीकरण सुरुय, फक्त आम्ही मोठे केलेले नेते भाजप घेतेय'

'भाजपचं काँग्रेसीकरण सुरुय, फक्त आम्ही मोठे केलेले नेते भाजप घेतेय'

छोट्या कार्यकर्त्यांना मोठे करावे,राजकारणात रेडिमेट कपड्यांऐवजी शिवून घेणारे लोक महत्त्वाचे असतात, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

  • Share this:

सागर कुलकर्णी, (प्रतिनिधी)

मुंबई, 18 ऑगस्ट- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं काँग्रेसीकरण सुरुय. फक्त आम्ही मोठे केलेले लोक भाजप घेत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.

पण त्यांच्या कार्यकर्त्यांचे काय, त्यांनी छोट्या कार्यकर्त्यांना मोठे करावे,राजकारणात रेडिमेट कपड्यांऐवजी शिवून घेणारे लोक महत्त्वाचे असतात, असेही पाटील यावेळी म्हणाले.

महिला आघाडीचं कोणी गेलं असलं तरी त्याचा नगण्य परिणामही आमच्या पक्षावर झाला नाही. आमचे कार्यकर्ते कुठेही जाणार नाही. आमचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत.आघाडीची चर्चा सुरु आहे, पूरपरीस्थितीमुळं काही चर्चा रखडली होती. पण पुन्हा चर्चा करु.288 जागांसाठी उमेदवारांची चाचपणी करत आहे, पण आघाडी झाल्यावर आम्ही एकत्र काम करु, असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

आऊटगोईंग थांबता थांबेना, आघाडीतील नेते युतीच्या वाटेवर

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारली आहे. त्याचवेळी सोपल यांनी बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यानंतर दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट

विरोधी पक्षातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असून कोकणातील पाच ते सहा आमदारही भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीतील नेमके कोणते आमदार भाजपच्या वाटेवर आहेत, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अनेक आमदारांना भाजपमध्ये यायचं आहे. पण पक्षात कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं याचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यामुळे लवकरच भाजपमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात इनकमिंग होईल, असं म्हणत कोकणातही काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे संकेत भाजपच्या प्रसाद लाड यांनी दिले आहेत.

विधानसभेत युती अभेद्य राहणार

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सतत मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेली युती विधानसभा निवडणुकीआधी तुटेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र प्रसाद लाड यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. ‘विधानसभेसाठी सेना आणि भाजपमधील युती कायमच रहाणार असल्याचा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.

SPECIAL REPORT: पवारांना धक्का देण्याची तयारी, बार्शीच्या राजकारणात चाललंय काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 01:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading