मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

..तर शरद पवार पश्चिम बंगालला जाणार, ममतादीदींनी फोनवर केली चर्चा

..तर शरद पवार पश्चिम बंगालला जाणार, ममतादीदींनी फोनवर केली चर्चा

मुख्यनंत्री ममता बॅनर्जी या पुढील महिन्यात कोलकातामध्ये भाजपविरोधी मेळावा आयोजित करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे ममतादीदींनी भाजपविरोधात कंबर कसण्यात सुरूवात केली आहे.

मुख्यनंत्री ममता बॅनर्जी या पुढील महिन्यात कोलकातामध्ये भाजपविरोधी मेळावा आयोजित करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे ममतादीदींनी भाजपविरोधात कंबर कसण्यात सुरूवात केली आहे.

मुख्यनंत्री ममता बॅनर्जी या पुढील महिन्यात कोलकातामध्ये भाजपविरोधी मेळावा आयोजित करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे ममतादीदींनी भाजपविरोधात कंबर कसण्यात सुरूवात केली आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 21 डिसेंबर: पश्चिम बंगालमध्ये (West bengal election) होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका (Assembly Election 2021) तोंडावर आल्या असताना सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. केंद्र सरकारच्या सहकार्यानं भाजप पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचं सरकार पाडण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी केला आहे. त्यामुळे तृणमुल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी फोनवर चर्चा केली. शरद पवार हे गरज भासल्यास पश्चिम बंगालला जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे. हेही वाचा...भाजप खासदाराच्या पत्नीचा TMC मध्ये प्रवेश, काही तासांत पतीची घटस्फोटाची नोटिस मिळालेली माहिती अशी की, मुख्यनंत्री ममता बॅनर्जी या पुढील महिन्यात कोलकातामध्ये भाजपविरोधी मेळावा आयोजित करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे ममतादीदींनी भाजपविरोधात कंबर कसण्यात सुरूवात केली आहे. ममतादीदींनी शरद पवार यांच्यासह छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टालिन यांच्यांशी फोनवर या संदर्भात चर्चा केली आहे. ममतादीदींनी शरद पवारांसह उभय नेत्यांशी फोनवर चर्चा करून त्यांना पश्चिम बंगालमध्ये येण्याचं आमंत्रणही दिले आहे. यावेळी आता देशातील विरोधी पक्षातील नेते भाजपविरुद्ध एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजप केंद्र सरकारच्या मदत घेऊन सत्ताधारी सरकारचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रकार गंभीर असून या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील इतर नेत्यांशी संवाद साधून चर्चा केली. भाजप विरोधात रणनीती ठरवण्याबाबतही चर्चा झाली, असं नवाब मलिक यांनी माहिती दिली . हेही वाचा...Alert! ब्रिटनमधील नव्या Corona Virus मुळे भारतासह 'या' देशांनी घातली प्रवास बंदी अमित शहांवर ममतादीदींचा पलटवार... दुसरीकडे, मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी सोमवारी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर पलटवार केला. भाजप हा चीटिंगबाज पक्ष आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात. ममता दीदी म्हणाल्या, नागरिकत्व सुधारणा विधेयकाला(Citizenship Amendment Act) तृणमूल काँग्रेसचा सुरूवातीपासून विरोध आहे. भाजप जनतेच्या भविष्याचा निर्णय घेऊ शकत नाही, असा टोला देखील लगावला.
First published:

Tags: Mamata banerjee, Sharad pawar

पुढील बातम्या