'वरळीचा कचरा बांद्रयाने स्वीकारला...उद्धवजी आपले मन:पूर्वक आभार...!'

सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच सोशल मीडियावर त्यांच्याशीसंबंधीत अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. राष्ट्रवादीने त्यांना काय दिलं नाही असा सवाल त्यातून करण्यात आलाय.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 06:39 PM IST

'वरळीचा कचरा बांद्रयाने स्वीकारला...उद्धवजी आपले मन:पूर्वक आभार...!'

सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच सोशल मीडियावर त्यांच्याशीसंबंधीत अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. वरळीचा कचरा बांद्र्याने स्वीकारला...उद्धवजी आपले मन:पूर्वक आभार...! अशी टीका शिवसेना आणि अहिरांवर करण्यात आलीय.

तर दुसऱ्या एका फोटोत सचिन अहिर यांना उंदराची उपमा देण्यात आलीय. उंदीर पळाला असं त्या फोटोत दाखविण्यात आलंय. जिकडे फायदा दिसला तिकडे अहिर गेलेत. तत्व, पक्ष निष्ठा अशा सर्व गोष्टी त्यांच्यासाठी गौण असल्याचं त्यातून सांगण्यात आलंय.

तर आणखी एका फोटोत शरद पवारांनी सचिन अहिर यांना कुठली कुठली पदं दिलीत त्याची यादीच दिली आहे. एवढं सगळं देऊनही ते पक्ष सोडून गेलेत. त्यांनी पक्षाला धोका दिला असं त्यात दाखविण्यात आलंय.

अहिरांना शरद पवारांनी सर्व काही दिलं होतं त्यांनी फक्त स्वत:चा विचार केला. पवारांनी त्यांना एवढ्या कमी वयात हे सगळं दिलं. त्यांना वयाच्या 80 व्या वर्षी काय वाटलं असेल याचा विचार त्यांनी केला का असा प्रश्नही सचिन अहिर यांना विचारण्यात येतोय.

Loading...

मुंबईतल्या वरळी भागात अहिर यांचा दबदबा आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्याही ते संपन्न असल्यानं शिवसेनेला त्याचा दुहेरी फायदा होणार आहे. आता सोशल मीडियाच्या प्रभावानंतर नेत्यांना आरसा दाखविण्याचं काम लोक करत असतात. हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 06:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...