Home /News /news /

मंदिरे खुली करण्यावरून श्रेयवाद, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

मंदिरे खुली करण्यावरून श्रेयवाद, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

जयंत पाटील यांनी अहमदनगरमध्ये बोलताना भारतीय जनता पक्षावर चांगलीच टीका केली आहे.

अहमदनगर, 16 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अहमदनगरमध्ये बोलताना भारतीय जनता पक्षावर मंदिर उघडण्याच्या श्रेय वादावरून चांगलीच टीका केली आहे. 'भाजपला मंदिर उघडण्याचं श्रेय जाऊ शकत नाही. कारण लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासूनच धार्मिक स्थळे बंद ठेवा असा आदेश खाली आला होता. राज्यात विविध ठिकाणी कोरोना रुग्ण आहेत. हे कसे कमी करावे यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहे. यामुळे प्रत्येक गोष्टी हळूहळू उघडण्याच्या आमचा प्रयत्न होता. म्हणून आधी रेल्वे चालू झाली, त्यानंतर इतर व्यवसाय सुरू झाले आणि शेवटच्या टप्प्यात प्रार्थनास्थळे चालू करण्यात आली आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाला फक्त प्रत्येक गोष्टींमध्ये राजकारण करायचं असतं,' असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नक्की काय म्हणाले जयंत पाटील? 'याच भारतीय जनता पक्षाने काही महिन्यापूर्वी मंदिराच्या बाहेर जाऊन थाळी वाजवा आंदोलन केलं. मात्र कोरोना रुग्ण कशाप्रकारे कमी होतील यासाठी त्यांचे काही सल्ले सूचना आल्या असत्या तर मी समजू शकत होतो. आम्ही विरोधी पक्षात असून सुद्धा केंद्रांचे प्रत्येक मार्गदर्शन आम्ही ऐकले. कोरोनाची महामारी पूर्ण जगात आली आहे. या महामारीच्या विरुद्ध लढताना कुठल्याही प्रकारे राजकारण करायचा नाही हे आमचे सरकारने निश्‍चित केलं होतं. मात्र भाजपला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे असते यामुळे भाजपाला मंदिर उघडण्याच्या श्रेय जात नाही. उलट गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरे खुली करण्याचं श्रेय मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला जाते,' असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Jayant patil

पुढील बातम्या