Home /News /news /

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावरून राष्ट्रवादी आक्रमक, केली 'ही' मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावरून राष्ट्रवादी आक्रमक, केली 'ही' मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'वर अज्ञातांकडून मंगळवारी तोडफोड.

    मुंबई, 08 जुलै: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेलं 'राजगृह' इथे दोन अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी रात्री हल्ला केला. निवसस्थानाची तोडफोड केली या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. 'महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान 'राजगृह' ही आमची अस्मिता आहे, माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो.' या प्रकरणी माथेफिरूवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई तातडीनं करण्याची मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर मंगळवारी रात्री दोन अज्ञातांनी हल्ला केला. घराच्या काचांवर दगडफेक करण्यात आली तर कुंड्यांचं मोठं नुकसान करण्यात आलं. राजगृह हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे या निवासस्थानाला विशेष महत्त्व आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणी तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला असून माथेफिरू आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Anil deshmukh, Jitendra awhad, NCP

    पुढील बातम्या