मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाचा उल्लेख करत अजित पवारांनी साधला भाजपवर निशाणा

एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाचा उल्लेख करत अजित पवारांनी साधला भाजपवर निशाणा

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

नांदेड, 27 नोव्हेंबर : 'भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळत नाही काय बोलावं.. भाजपचे काही नेते काहीही बोलतात. कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा येणार असं त्यांना सांगावं लागतं. मात्र भाजपने एकनाथ खडसे आणि जयसिंग गायकवाड यांच्या सारख्या नेत्यांचा सन्मान केला नाही,' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. विधानपरिषद निवडणूक प्रचारानिमित्त ते नांदेड इथं बोलत होते.

अजित पवार यांनी नांदेडमध्ये बोलताना उपस्थित लोकांनाही आवाहन करत इशारा दिला आहे. 'लोक कोरोना विसरले..आता नांदेडला पण खूप गर्दी झाली आहे..काळजी घ्या...अजून कोरोना गेला नाही,' असं अजित पवार म्हणाले.

आरक्षणावर भाष्य आणि आवाहन

'ज्या ज्या समाजाची आरक्षणाची मागणी आहे..तेव्हा इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मार्ग काढण्याचा पर्यंत सुरू आहे. जनतेला विनंती आहे की आरक्षणावरून तेढ निर्माण करू नका,' असं आवाहन अजित पवार यांनी आरक्षणप्रश्नी बोलताना केलं आहे.

अशोक चव्हाणांचाही हल्लाबोल

'मागील एका वर्षात राज्याने कोरोनावर मात केली...आर्थिक परिस्थिती देखील सुधारात आहे. कोरोनामुळे आपण सर्व पैसे आरोग्यावर खर्च केले. या व्हायरसची दुसरी लाट येऊ नये म्हणून आम्ही सगळे जिद्दीने कामाला लागलो. मात्र फडणवीस म्हणाले हे बोल बचन सरकार आहे. तुम्हीच सांगा की 15 लाख दिले का...तुमचं सरकार बोल बचन आहे की आमचं?' असा सवाल करत काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपवर घणाघात केला आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Nanded