VIDEO: 'तेरे मिलने को न आएंगे सनम' जितेंद्र आव्हाडांनी गायलं संजय राऊतांच्या मनातलं गाणं!

VIDEO: 'तेरे मिलने को न आएंगे सनम' जितेंद्र आव्हाडांनी गायलं संजय राऊतांच्या मनातलं गाणं!

आजच्या राजकारणाचे मुख्य सुत्रधार शरद पवार आहेत आणि सुत्र संचलन संजय राऊत करत असतील तर त्यांच्या मनात कोणते गाणं येईल?

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : राज्यात सध्या सत्तासंघर्ष टोकाला गेला आहे. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर आता शिवसेनेचा आघाडीसोबत सत्ता स्थापनेचा प्रयत्न आहे. या सगळ्या सत्ता नाट्यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे टॉपला आहेत. शिवसेनेची भूमिका ठाम मांडण्यामध्ये संजय राऊत फोकसमध्ये होते. संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये भाजपवर जोरदार टीका केली. यासगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या गाण्याच्या शैलीत विरोधकांवर टोला लगावला आहे.

आजच्या राजकारणाचे मुख्य सुत्रधार शरद पवार आहेत आणि सुत्र संचलन संजय राऊत करत असतील तर त्यांच्या मनात कोणते गाणं येईल? 'तेरी गलिओ में ना रखेंगे कदम, आजके बाद' आणि हे गाणं म्हणतं जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

राज्यात सत्ता स्थापनेवरून अद्यापही कोणताच तोडगा निघालेला नाही. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर आणि नंतर महायुतीतून शिवसेना बाहेर पडल्यानंतर राज्यात नव्या समीकरणांची नांदी सुरू झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी ऐतिहासिक आघाडी स्थापन्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र याबाबत आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

शिवसेनेसोबत काँग्रेस नेते थेट चर्चा करत असल्यामुळे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे. कारण काँग्रेसच्या नेतृत्वाकडून राज्यातील नेतत्वाला राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र राज्यातील नेते थेट शिवसेनेसोबत चर्चा करत आहे. याच कारणामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी राज्यातील नेत्यांवर नाराज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

इतर बातम्या - आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही, चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला जवळपास तीन आठवडे पूर्ण झाल्यानंतरही राज्यात नव्या सरकारची स्थापना होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्रिपवरून भाजपसोबत बिनसल्यानंतर शिवसेनेनं आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तावाटपाची बोलणी सुरू केली आहे. मात्र राज्यात सत्तास्थापनेसाठी पहिल्यांदाच अशी आघाडी होत असल्याने चर्चेला उशीर होत आहे. त्यातच आता एका मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एका मुद्द्यावरून मतभेद झाल्याची माहिती आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे या दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याच मुख्यमंत्रिपदावरून आता महाशिवआघाडीतही मतभेद सुरू आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाबाबत 50-50 च्या फॉर्म्युल्याची मागणी केली आहे. मात्र पूर्ण पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री हवा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे या संभाव्य आघाडीत पेच निर्माण झाला आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

इतर बातम्या - भाजपला सत्ता गमावण्याचा धोका, शिवसेना पालिकेत वापरणार महाशिवआघाडी पॅटर्न?

मंत्रिपदांच्या वाटणीवरून शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सहमती नसल्याची माहिती आहे. मंत्रिपदाबाबत शिवसेनेनं 16- 14- 12 च्या फॉर्म्युला मांडला आहे. तर तीनही पक्षांना समान म्हणजेच 14-14-14 अशा फॉर्म्युल्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं कळतंय. त्यामुळे सत्तावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 05:58 PM IST

ताज्या बातम्या