News18 Lokmat

गुजरातेत राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, अहमद पटेलांच्या अडचणीत वाढ

गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय. गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2017 10:02 AM IST

गुजरातेत राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, अहमद पटेलांच्या अडचणीत वाढ

मुंबई, 8 ऑगस्ट : गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय. गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत. गुजरातमध्ये राज्यसभेसाठी मतदान होतंय. राष्ट्रवादीचे गुजरातमधील आमदार कांदल जाडेदा यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्याकडून यासंबंधीचे आदेश आल्याचं जाडेदा यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, जनता दल युनायटेड आणि पाटीदार समाजाच्या एका आमदारानेही भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने अहमद पटेल यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय.

गुजरातमध्ये काँग्रेसच्या 6 आमदारांनी यापूर्वीच राजीनामे दिले असल्याने अहमद पटेलांना मतांचं गणित जुळवताना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आज रात्रीतून आणखी काही दगाफटका झाला तर कदाचित अहमद पटेलांचा या निवडणुकीत पराभवही होऊ शकतो. अहमद पटेल हे सोनिया गांधीचे निकटवर्तीय असल्याने भाजपकडून त्यांचा पराभव करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जाणार यात शंका नाही. त्याचाच भाग म्हणून भाजपने राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, जनता युनायटेडचं समर्थन मिळवल्याची तिरकी चाल खेळल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2017 10:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...