'आयकर विभागाचे छापे टाकून विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका'

'आयकर विभागाचे छापे टाकून विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका'

'सध्या एनडीएचे लोक सशाच्या भूमिकेत असून यूपीएचे लोक कासवाच्या भूमिकेत आहेत. मात्र विजय हा नेहमी कासवाचाच होतो. कारण पाच वर्षांपूर्वी जी आश्वासनं दिली होती, त्यातलं एकही पूर्ण झालेलं नाही'

  • Share this:

नवी मुंबई, 08 एप्रिल : 'आयकर विभाग आणि ईडीच्या धाडींनी विरोधकांना घबरवण्याचा प्रयत्न करू नका, विरोधक घाबरणार नाहीत, उलट तुमच्या पाच वर्षातल्या नटसम्राटगिरीची परतफेड मतदार करतील' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी एनडीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. कल्याण लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करण्यात आला, यावेळी गणेश नाईक बोलत होते.

'सध्या एनडीएचे लोक सशाच्या भूमिकेत असून यूपीएचे लोक कासवाच्या भूमिकेत आहेत. मात्र विजय हा नेहमी कासवाचाच होतो. कारण पाच वर्षांपूर्वी जी आश्वासनं दिली होती, त्यातलं एकही पूर्ण झालेलं नाही' अशी टीका गणेश नाईक यांनी केली.

सध्या देशभरात सुरू असलेल्या आयकर विभागाच्या धाडींवरही त्यांनी सरकारला लक्ष्य करत हा विरोधकांना घाबरवण्याचा रडीचा डाव असल्याची टीका नाईकांनी केली. कल्याण लोकसभेतून काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीकडून बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोठं शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत मनसेचे डोंबिवली शहर संघटक आणि माजी परिवहन सद्यस प्रल्हाद म्हात्रे सुद्धा हजर होते.

डोंबिवलीच्या गणेश मंदिरात दर्शन घेऊन मोठी रॅली काढली. या रॅलीत शेकडो लोक सहभागी झाले होते. नेवाळी आंदोलनात झालेला अन्याय ग्रामस्थ विसरलेले नाहीत. तसंच नवी मुंबईतून वगळलेल्या १४ गावातले प्रश्नही कायम आहेत. त्यामुळे हे ग्रामस्थ आपल्याला संधी देतील, असा विश्वास बाबाजी पाटील यांनी व्यक्त केला.

तर सपा-बसपा आघाडीकडून रवींद्र केणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून संजय हेडाव यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

VIDEO : अजितदादांना आवडलं राज ठाकरेंचं भाषण, विनोद तावडेंचा केला 'पोपट'

First published: April 8, 2019, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading