रश्मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वावर केला 'हा' आरोप

रश्मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वावर केला 'हा' आरोप

पक्ष नेतृत्त्व कामाची कदर करत नसल्याने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याचे रश्मी बागल यांनी म्हटले आहे.

  • Share this:

विरेंद्रसिंह उत्पात, (प्रतिनिधी)

करमाळा, 21 ऑगस्ट- राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य रश्मी बागल यांन अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्ष नेतृत्त्व कामाची कदर करत नसल्याने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याचे रश्मी बागल यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू झाले असून अनेक काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करून भाजप-सेनेत प्रवेश केला आहे.

शिवबंधन बांधण्याची वेळ आली...

रश्मी बागल त्यांचे बंधू आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी आपल्या फेसबुक पेजवर 'शिवबंधन बांधण्याची वेळ आली आहे.' ही पोस्ट केली. व्हॉट्सअपवर व सोशल मीडियामध्ये शिवसेनेच्या प्रवासाचे फोटो व्हायरल केले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तानाजी सावंत, स्वर्गीय दिगंबरराव बागल, रश्मी बागल, दिग्विजय बागल यांचे फोटो असून आता शिवबंधन बांधूया हाती, असा मजकूर असलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोण आहेत रश्मी बागल?

माजी मंत्री दिगंबरराव बागल यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या जागी रश्मी बागल यांच्या मातोश्री शामल बागल यांना घेतली होती. राष्ट्रवादीने 2009 मध्ये त्यांना आमदार केले. दिगंबरराव बागल यांनी यांनी शरद पवारांच्या मंत्रिमंडळातही काम केलं होतं.

करमाळा विधानसभेला 2009 मध्ये माढा तालुक्यातील 36 गावे जोडली आणि या गावांना उत्तम साथ दिली. राष्ट्रवादीने 2014 च्या निवडणुकीत रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. पण अवघ्या 253 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. सोलापूर जिल्ह्यात बँकेच्या संचालक म्हणून पक्षाने त्यांना बढती दिली. सध्या रश्मी बागल यांच्याकडे मकाई आणि आदिनाथ साखर कारखाने आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. दिगंबरराव बागल यांची राजकीय वारसदार म्हणून रश्मी बागल या पुढे आल्या आहेत. या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी रश्मी बागल एक मानल्या जातात. आदिनाथ आणि मकाई काही या साखर कारखान्यावर त्यांची सत्ता आहे.

करमाळा हे रश्मी बागल यांचे माहेर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने सासवड येथील साखर महासंघाचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांचे चिरंजीव उद्योगपती गौरव कोलते यांच्याशी विवाह झाला. माहेरातच त्यांनी राजकारणात स्थिरावण्याचा सातत्याने प्रयत्न केला. माहेरच्यांनी देखील पदरात घेतले खरे, पण पक्षाने दखल घेतली नाही. नेहमी खंत राहिली करमाळ्यात पक्षापेक्षा गटाला नेहमीच जास्त लक्ष दिलं जातं. आणि आता बागल गट शिवसेनेत गेल्याने शिवसेनेची ताकद वाढणार आहे. तर आमदार नारायण पाटील यांची धाकधूक वाढली आहे.

राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2019 01:26 PM IST

ताज्या बातम्या