• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • 'या' जागांवर राष्ट्रवादी जिंकणार, धनंजय मुंडेंना विश्वास

'या' जागांवर राष्ट्रवादी जिंकणार, धनंजय मुंडेंना विश्वास

एक्झिट पोल अनेकदा खरे ठरले नाहीत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला 200 च्यावर जागा मिळणार नाहीत असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 20 मे : एक्झिट पोलचे अंदाज कधीच खरे ठरले नाहीत अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी रविवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. त्यानंतर सगळ्या वाहिन्यांनी आणि संस्थांनी एक्झिट पोलद्वारे अंदाज दिले. यामध्ये एनडीएला सगळ्यात जास्त जागा मिळणार असा दावा करण्यात आला. पण त्यावर विरोधकांनी अविश्वास दाखवला आहे. एक्झिट पोल अनेकदा खरे ठरले नाहीत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला 200 च्यावर जागा मिळणार नाहीत असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. राज्यात एनसीपी 13-16 जागांवर बाजी मारेल असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. बीड, मावळ, शिरूर, बारामती, उस्मानाबाद या जागा एनसीपी जिंकणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी ईव्हीएम आणि भाजपवर टीका केली. राज्यात ईव्हीएमचा गैरवापर करून निकाल लागतो असा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी शहरी भागात आघाडीचे नेते प्रचारात कमी पडले असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली. बीडमध्ये बजरंग सोनवणे जाएंट किलर ठरणार की मुंडे गड राखणार? EXIT POLL चा अंदाज समोर बीडची लोकसभेची जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने विजय मिळवून देणारी जागा मानली जाते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे यांनी इथे सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचं रेकॉर्ड केलं होतं. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना 9 लाख 22 हजार 416 मतं मिळाली. त्या 6 लाख 96 हजार 321 मताधिक्य मिळवून निवडून आल्या होत्या. या निवडणुकीतही भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना तिकीट दिलं. वंचित बहुजन आघाडी आणि बसपानेही इथे उमेदवार उतरवले आहेत. या सगळ्या उमेदवारांना टक्कर देत प्रीतम मुंडे बीडमधून पुन्हा विजयी होणार का ? याची जोरदार चर्चा आहे. हेही वाचा : ...तर नरेंद्र मोदी नाही BJPच्या दुसऱ्या नेत्याला मिळणार पंतप्रधानपदाची संधी? EXIT POLL : मावळमधून पार्थ पवारांचं काय होणार? समोर आला अंदाज लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. 'न्यूज18'च्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महाआघाडीला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर मावळमध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे असलेले शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिरूरमधून अमोल कोल्हेंचं काय होणार? EXIT POLL चा अंदाज समोर शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई झाली. सलग तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हान दिलं आहे. ही निवडणूक आढळराव पाटील यांना नेहमीप्रमाणे सोपी नक्कीच नव्हती. कारण त्यांच्याविरोधात उभे असलेले अमोल कोल्हे यांच्याकडे स्वत:ची प्रतिमा आणि राष्ट्रवादीचं या भागातील संघटन असं दुहेरी अस्त्र होतं. शिवाजीराव आढळराव पाटील यांचाही या भागात दांडगा जनसंपर्क आहे. मतदानानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. न्यूज18 च्या एक्झिट पोलनुसार, अमोल कोल्हे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो. त्यामुळे आढळराव पाटील हे शिरूरमधून पुन्हा विजयी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या माढा, बारामती, सातारा, कोल्हापूर यांसह भाजप-शिवसेना युतीने जिंकलेल्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2014 च्या निवडणुकीत युतीने मुसंडी मारत या भागात काँग्रेस-राष्ट्रवादीला पहिला हादरा दिला. यावेळी तर हे 10 मतदारसंघ जिंकण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. VIDEO : पंतप्रधान होणार का? नितीन गडकरींचं मोठं विधान
  First published: