Elec-widget

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मंगळवेढा दौरा रद्द

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मंगळवेढा दौरा रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उद्या होणारा मंगळवेढा दौरा रद्द झाला आहे.

  • Share this:

वीरेंद्र उत्पात, 22 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उद्या होणारा मंगळवेढा दौरा रद्द झाला आहे. मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचा उद्या दुपारी 3 वाजता नागरी सत्कार होणार होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते हा सत्कार होणार होता. मात्र महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी होत असलेल्या राजकीय हालचालींमुळे शरद पवारांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये शरद पवार यांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे शरद पवार यांचे पुढील दोन दिवसाचे सर्व कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना , शेतकरी कामगार पक्ष, मनसे, समाजवादी पक्ष, रिपाइं गवई व कवाडे गट आणि प्रहार संघटनेने हा सोहळा आयोजित केलेला होता. सरकार स्थापन झाल्यानंतर सत्कार समारंभाची पुढील तारीख व वेळ कळविण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यात वेगवान हालचाली, सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर

राज्यात अनोख्या समीकरणांसह नवं सरकार स्थापन होण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत एकमत झालं आहे. त्यानंतर आता मुंबईत हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत सुरू आहे. या बैठकीनंतर राज्यातील या नव्या महाविकास आघाडीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे दिसत असली तरीही मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र आता शेवटच्या क्षणी शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांचंही नाव पुढे आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही संजय राऊत यांच्या नावाकडे कल असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2019 05:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...