खडसेंच्या मुलीला पाडणं ही भाजपची चाणक्यनीती, राष्ट्रवादी नेत्याचा मोठा आरोप

खडसेंच्या मुलीला पाडणं ही भाजपची चाणक्यनीती, राष्ट्रवादी नेत्याचा मोठा आरोप

निष्ठावंत नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (नाथाभाऊ) यांनी धक्का बसला. नाथाभाऊंची कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांचा जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून पराभव झाला.

  • Share this:

नाशिक,24 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांच्या मुलीला पाडण्यामागे भाजपची चाणक्यनीती असल्याचा आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या टीकेमुळे सध्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता भाजप काय प्रतिक्रिया देतं हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

निष्ठावंत नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (नाथाभाऊ) यांनी धक्का बसला. नाथाभाऊंची कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांचा जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून पराभव झाला. शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला. यावरच रोहिणी खडसेंना निवडणुकीत पाडण्यामागे भाजपची चाणक्य़नीती असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी युतीत आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठा खुलासा करून सेनेच्या इशाऱ्यातून हवा काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे.

इतर बातम्या - BREAKING: शिवसेनेच्या विजयी मिरवणूकीदरम्यान राष्ट्रवादी नेत्याच्या घरावर तुफान दगडफेक

भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपद घेणार का आमच्यासोबत येऊन मुख्यमंत्रिपद घेणार, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. शिवसेना भाजपसोबत राहूनही मुख्यमंत्रिपद घेऊ शकते, आता ते शिवसेनेने ठरवायचे आहे, असेही भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले. येवल्यातून छगन भुजबळ निवडून आले आहेत.

VIDEO: बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आईचा लेक जिंकला आमदारकी, मुलाचा बहुमान पाहून मातेला अश्रू अनावर

BJP ला अपेक्षेप्रमाणे यश नाही.. खडसे म्हणाले, NCP च्या कुरघोडीमुळे कन्येचा पराभव

विधानसभा निवडणुकीत बंडखोरांची बंडाळी आणि भाजपन घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे रोहिणी खेवलकर-खडसे यांचा पराभव झाला आहे. अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळले नाही. उत्तर महाराष्ट्रात भाजपला 40 जागा मिळतील, असे गिरीश महाजन यांनी सांगितलं. मात्र, तसे झालेले दिसत नाही. राष्ट्रवादीने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेऊन शिवसेना बंडखोर चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कृत करण्याची खेळी केली. मागील पाच वर्षांपासून मुक्ताईनगरात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती होती. त्याचा फटका भाजपला बसला. परिणामी कन्या आणि भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे याचा निसटता पराभव झाला. कार्यकत्यांनी खूप परिश्रम घेतले. मात्र, कुठे चुकले ते शोधावे लागेल, असेही ते म्हणाले.

इतर बातम्या - महाराष्ट्राच्या राजकारणातील नवं पर्व, रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंना फोन आणि...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 09:04 PM IST

ताज्या बातम्या