राष्ट्रवादीच्या उमेदवाराची थेट पोलिस अधिकाऱ्यांसमोर हात-पाय तोडण्याची भाषा

राष्ट्रवादीच्या उमेदवाराची थेट पोलिस अधिकाऱ्यांसमोर हात-पाय तोडण्याची भाषा

बीडमध्ये काका-पुतण्याचा संघर्ष गेला टोकाला...

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,19 ऑक्टोबर: पैसे वाटताना कोणी सापडलं तर त्याचे हात-पाय तोडू, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करवा अन्यथा आम्हाला त्याला सरळ करावे लागेल, असे स्फोटक वक्तव्य बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

थेट पोलिस अधिकाऱ्यांसमोर संदीप क्षीरसागर यांनी हात-पाय तोडण्याची भाषा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीड शहरात काका-पुतण्याचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी आव्हान उभे केले आहे.

शहरातील खंडेश्वरी मंदिर परिसरात पैसे वाटप करणाऱ्या सुरेश बनसोडे यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडले. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर चांगलेच आक्रमक झाले. यावेळी प्रशासनावर संताप व्यक्त केला. उपस्थित पोलिस अधिकाऱ्याला कारवाई करण्याबाबत त्यांनी आग्रह धरला. तसेच वारंवार निवडणूक आयोगाकडे तक्रारी देवून देखील असे प्रकार समोर येत असतील तर काय, असा सवाल उपस्थित केला. तुम्ही पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई करणार नसाल तर आम्हाला दिसले तर हातपाय तोडू, असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिला. या प्रकारामुळे बीड शहरातील वातावरण तापले आहे.

काका-पुतण्यात काट्याची टक्कर...

बीडमध्ये काकाविरुद्ध पुतण्या ही फाईट होत असून काका जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर पुतण्या संदीप क्षीरसागर यांचे आव्हान उभे केले आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या काका जयदत्त क्षीरसागर यांना पराभव समोर दिसू लागल्याने पैसे वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पैसे वाटणारा आणि घेणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे काका पुतण्याचा संघर्ष अत्यंत टोकाला गेला आहे.

VIDEO: अमृता फडणवीसांनी जाहीर केला दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचा निकाल, म्हणाल्या...

Published by: Sandip Parolekar
First published: October 19, 2019, 5:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading