'सहा महिन्यात सातबारा कोरा करू, नाहीतर पवारांची औलाद सांगायचो नाही'

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामुळं अजित पवार चांगलेच अडचणीत आलेत. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचा आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 08:04 PM IST

'सहा महिन्यात सातबारा कोरा करू, नाहीतर पवारांची औलाद सांगायचो नाही'

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 24 ऑगस्ट : राज्य सहकारी बँकेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी अखेर मौन सोडलं आहे. कर्ज वितरण प्रकरणात आपण दोषी नसल्याचा दावा अजित पवारांनी बीडच्या जाहीर सभेत केला आहे. हे कर्ज मंजूर केलं त्यावेळी भाजप, सेनेचे प्रतिनिधी बँकेच्या मंडळावर होते हे सांगायला ते विसरले नाहीत.'आमचं सरकार सत्तेवर आलं तर पहिल्या चार ते सहा महिन्यांच्या आत सातबारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद नाही' अशा शब्द राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळी शहरात झालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत बोलताना दिला. तसंच आम्ही काँग्रेससोबत आघाडी करणार आहोत धनंजय मुंडेंची राज्याला गरज आहे. त्यांना परळीत बांधून ठेवू नका, त्यांच्या विजयाची जवाबदारी तुम्ही घ्या असं आवाहन करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडणून देत इतिहासाची पुनरावृती करा असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामुळं अजित पवार चांगलेच अडचणीत आलेत. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचा आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिला आहे. याप्रकरणी आता खुद्द अजित पवारांनी बीड जिल्ह्यातील एका जाहीर सभेत खुलासा केला आहे. या कर्ज वाटपात आपण एक पैसाही घेतला नसल्याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे.

'हे कर्ज वितरीत करण्यात आलं, त्यावेळी बँकेच्या मंडळावर भाजप-सेनेचे लोकही पदाधिकारी होते' असंही पवारांनी सांगीतलं. तसंच बँकेची कर्ज समिती आणि कार्यकारी समितीच्या बैठकीला आपण हजर नसल्याचा दावाही यावेळी अजित पवारांनी केला.

काय आहे राज्य सहकारी बँक प्रकरण

Loading...

- 2005 ते 2010 या 5 वर्षात राज्य सहकारी बँकेनं हे कर्ज वितरीत केलं होतं.

- कर्ज वितरीत करताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- बँकेवर पदाधिकारी असलेल्या राजकीय नेत्यांनी आपल्या मर्जीतल्या संस्था, व्यक्तींना नियमबाह्यपणे कर्ज वाटल्यानं बँक अडचणीत आली होती.

इतर बातम्या - BREAKING: दहीहंडी उत्सवाला गालबोट, पाचव्या थरावरून कोसळून गोविंदाचा मृत्यू

- विशेष म्हणजे नाबार्ड, सहकार, साखर आयुक्त, कॅगच्या अहवालानंतरही या कर्ज वितरणप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला नाही.

- आता मात्र उच्च न्यायालयानं या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेला गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे.

इतर बातम्या - मुंबईत मायेचा हात फिरवणाऱ्या बापानेच केला लेकीवर बलात्कार, रोज पाजायचा दारू

अजित पवारांसह 50 जणांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळं विरोधकांना मात्र टीका करण्याची आयतीचं संधी मिळाली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्य़ा तोंडावर कोर्टाच्या निर्णयामुळं अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीचं कोंडी झाली आहे.

दहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...