नाव न घेता अजित पवारांचा आंबेडकरांना टोला; म्हणाले, 'भाजपची बी टीम'

नाव न घेता अजित पवारांचा आंबेडकरांना टोला; म्हणाले, 'भाजपची बी टीम'

सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा एकमेव कार्यक्रम भाजप-सेनेचा सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीची घोषणा करण्यासाठी मुंबईमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेतून महाआघाडीची घोषणा करत विरोधी पक्षाकडून भाजप-शिवसेनेवर सडकून टीका करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेसाठी अशोक चव्हाण, जयंत पाटील, राजू शेट्टी, छगन भुजबळ, शेकापचे नेते जयंत पाटील, रिपाई कवाडे गटाचे नेते जोगेंद्र कवाडे, रिपाईचे राजेंद्र गवई, रवी राणा इत्यादी उपस्थित होतं.

नेमकं काय म्हणाले अजित पवार

- जादीयवादी पक्षांना दूर सारा, महाराष्ट्रातील जनतेला आव्हान

- युतीचा पराभव करायचा असेल तर मतभेद विसरा

- मित्रपक्षांसाठी जागा सोडाव्या लागतील.

- जे महाआघाडीमध्ये आले नाही त्यांचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा आहे. त्यांची बी टीम आहे.

- प्रकाश आंबेडकर यांच नाव न घेता भाजपची 'बी टीम'

- गेल्या 5 वर्षात यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. पण तरीदेखील 48 जागांपैकी भाजप-सेनेनं अजून जागा जाहीर केलेल्या नाहीत.

- 5 वर्ष सत्ता असतानादेखील 25 टक्के उमेदवार हे त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागली.

- सरकारने जर चांगलं काम केलं तर त्यांना इतर पक्षातून उमेदवार घेण्याची वेळ का आली? अजित पवारांचा खडा सवाल

- असं तोडफोडीचं राजकारण भारतात याआधी कधी पाहिलं नव्हतं.

- सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा एकमेव कार्यक्रम भाजप-सेनेचा सुरू आहे.

- सरकारने चौकशीचा ससेमिरा लावत अनेकांना पक्ष प्रवेश घ्यायला भाग पाडलं.

महाआघाडीच्या पत्रकार परिषदेकडे विखे पाटलांनी फिरवली पाठ!

काँग्रेस-राष्ट्रवादीने आज पत्रकार परिषद घेऊन अखेर महाआघाडीची घोषणा केली. परंतु, या पत्रकार परिषदेला काँग्रेस विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर होते. विखे पाटलांच्या अनुउपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाआघाडीची घोषणा केली. अखेर चार महिन्यांच्या कालावधीनंतर दोन्ही पक्षांकडून आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाआघाडीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार ,जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी हजर होते.

महाआघाडीचे सर्व नेते हजर असताना विखे पाटलांनी मात्र, पाठ फिरवली. विखे पाटील हे आज आपल्याच मतदारसंघात आहे. त्यामुळे ते मुंबईला आलेच नाही. त्यांच्यासह मुंबईचे शहर अध्यक्ष संजय निरुपम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील अनुउपस्थित होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच विखेंचा मुलगा सुजय हा भाजपात दाखल झाला. राधाकृष्ण विखे सुद्धा भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असं स्पष्ट केलं. परंतु, शिर्डीत सेनेच्या उमेवादाचा आणि नगरमध्ये आपल्या मुलाचा प्रचार करणार असं विखेंनी सांगितल्याचं सेनेच्या नेत्याने काल दावा केला होता.

विखे पाटलांची नेमकी भूमिका आहे यावरून काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. त्यातच आज झालेल्या महाआघाडीच्या पत्रकार परिषदेला विखेंनी सपशेल पाठ फिरवली आहे.

VIDEO: उदयनराजे म्हणाले...'मी जे बोललोच नाही, ते दाखवले गेले'

First published: March 23, 2019, 5:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading