राष्ट्रवादीला धक्का, 55 नगरसेवक साथ सोडणार; महापालिकेची सत्ताही जाणार

राष्ट्रवादीला धक्का, 55 नगरसेवक साथ सोडणार; महापालिकेची सत्ताही जाणार

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव सत्ता असलेली महापालिका हातून निसटणार असल्यामुळे शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो.

  • Share this:

नवी मुंबई, 06 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांआधीच राष्ट्रवादीच्या एकमेव अशा नवी मुंबई नगरपालिकेवर आता भाजपचा झेंडा फडकणार आहे. नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये आज सत्तांत्तर होणार आहे. राष्ट्रवादीचे 55 नगरसेवक एक वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. बरं इतकंच नाही तर येत्या 9 तारखेला हे 55 नगरसेवक गणेश नाईकांसोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव सत्ता असलेली महापालिका हातून निसटणार असल्यामुळे शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे 55 नगरसेवक आज पक्षातून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईतून राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. तर 9 सप्टेंबरला गणेश नाईकांचा भाजपमध्ये भव्य प्रवेश होणार आहे. यावेळी 55 नगरसेवकांचा गट गणेश नाईकांसोबत भाजपात प्रवेश करणार आहेत.

गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला! नवी मुंबईत होणार भव्य कार्यक्रम

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. गणेश नाईक हे 9 सप्टेंबरला नवी मुंबईत भव्य कार्यक्रमात भाजप प्रवेश करणार आहेत. नाईक यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि माजी खासदार संजीव नाईक हेदेखील भाजपमध्ये जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत गणेश नाईक भाजपमध्ये दाखल होतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा जे पी नड्डा हेदेखील नाईकांच्या भाजप प्रवेशावेळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाईकांनी सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

धक्कादायक बातमी - कुत्र्याला वाचवण्यासाठी गेला मुलगा, मदतीसाठी धावली आई; पण कोणीही नाही बचावलं!

नाईक कुटुंबात नाही पडणार फूट

दरम्यान, भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांना मोठा झटका बसेल असं बोललं जात होतं. कारण गणेश नाईक यांचा मोठा मुलगा आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी काल (शनिवारी) राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत सपत्नीक गाडीने प्रवास केला. संवाद यात्रेच्या माध्यामातून सुप्रिया सुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत.

इतर बातम्या - MRI करताना 8 वर्षाच्या मुलीचा झाला जागीच मृत्यू, कारण...

नवी मुंबईतील संवाद यात्रेवेळी संजीव नाईक हे आपल्या पत्नीसह सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिसून आले. संजीव नाईक यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत सुप्रिया सुळेंना सोडलं. तसंच दुपारी 1 वाजता पुन्हा सुप्रिया सुळे आणि संजीव नाईकांची भेट झाली. त्यामुळे संजीव नाईक हे राष्ट्रवादीतच राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. मात्र आता संजीव नाईक यांच्याही भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे.

VIDEO: ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडताच तरुणाने पेटवली बाईक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 12:42 PM IST

ताज्या बातम्या