S M L

'खंडणी'च्या जोरावर माओवाद्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे!

बिहार आणि झारखंडमधले माओवादी आपली मुलं आणि नातेवाईकांच्या उच्च शिक्षणासाठी लाखो रूपयांची डोनेशन्स देत असल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे. खंडणीच्या जोरावरच माओवाद्यांनी कोट्यवधींची संपत्ती जमवल्याची माहितीही गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Ajay Kautikwar | Updated On: May 7, 2018 07:01 PM IST

'खंडणी'च्या जोरावर माओवाद्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे!

नवी दिल्ली,ता.07 मे: बिहार आणि झारखंडमधले माओवादी आपली मुलं आणि नातेवाईकांच्या उच्च शिक्षणासाठी लाखो रूपयांची डोनेशन्स देत असल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे. याबाबतचे पुरावे केंद्रीय गृहमंत्रालयाला मिळाले आहेत.

मुलं आणि नातेवाईकांना इंजिनिअर आणि मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी माओवादी पाहिजे तेवढं डोनेशन्स देतात. या पैशाचा मुख्य स्त्रोत हा खंडणी आहे अशी माहितीही गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलाय. झारखंड स्पेशल एरीया कमांडर प्रद्युम्न शर्मा यांने पुतण्याच्या मेडिकलच्या अॅडमिशनसाठी 22 लाख तर याच संघटनेच्या संदिप यादव याने मुलाच्या इंजिनिअरिंगच्या अॅडमिशनसाठी 22 लाख रूपये दिले आहेत.

तर नोटबंदीच्या काळात संदिपने 15 लाख रूपयांच्या नोटा बदलून घेतल्याची माहितीही गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलीय. प्रदुम्न शर्माच्या नावावर 51 गुन्ह्यांची नोंद असून त्याच्याकडे 37 लाखांची जमीन त्याच्या नावावर आहे.

संदिप यादवने रांचीत 30 लाखांचा फ्लॅट घेतला असून बांधकाम व्यवसायात त्यानं 50 लाखांची गुंतवणूक केली आहे. या आधीच ईडीनं 1 कोटी 45 लाखांची त्याची संपत्ती जप्त केली आहे. 32 एकर जमीन, दोन बसेस, 11 कार्स आणि जीप, 2 ट्रॅटर्स एवढी संपत्ती त्याच्या नावावर ईडीला सापडली. झारखंड मधल्या दलमचा कडवा सदस्य अरविंद यादव याने भावाच्या इंजिनिअरिंगच्या अॅडमिशनसाठी 12 लाख मोजले.

खासगी कंत्राटदार, व्यावसायिक, खाण मालक,वाहतूकदार आणि तेंदुपत्त्याचे ठेकेदार यांच्याकडून माओवादी कोट्यवधींची खंडणी वसूल करत असतात. या माओवादी संघटना आदिवासींची डोकी भडकवून त्यांच्या मुलांची ते संघटनेत भरती करतात, मात्र स्वत:ची मुलं ही चांगली शिकतील याची काळजी घेत असल्याचं यातून स्पष्ट होतं.

Loading...
Loading...

माओवाद्यांची रसद तोडून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्य सरकारांच्या मदतीनं काम करत आहे. सीबीआय, आयबी, सीआयडी, ईडी, यांनी कंबर कसली असून माओवाद्यांचा अर्थपुरवढा बंद करण्याची सरकारची योजना आहे.

दरम्यान सक्तवसुली संचालनालयानं संदिप यादव, प्रदुम्न शर्मा, विनय यादव आणि मुसाफीर सहनी यांच्या विरूद्ध मनिलॉड्रिंक प्रकरणी 4 गुन्हे नोंदवले आहेत. तर संदिप आणि प्रदुम्नची दीड कोटींची संपत्ती जप्त केलीय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2018 07:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close