...म्हणून ‘ठाकरे’ सिनेमात या सीनवेळी भावुक झाला नवाजुद्दीन

शिवसेनेच्या इतिहासात मीनाताई यांना ठाकरेंच्या जीवनातील सर्वात मजबूत आधारस्तंभ मानले जाते.

  • Share this:

एक अभिनेत्री म्हणून अमृता रावच्या अभिनयावर कोणीच शंका घेऊ शकत नाही. मात्र अमृताच्या स्वतःच्याच निर्णयांनी तिचं करिअरमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. मात्र अमृता लवकरच बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘ठाकरे’ या बायोपिकमधून सर्वांच्या समोर येणार आहे.

सध्या सिनेमात ठाकरेंची भूमिका करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी अमृताच्या अभिनयाचं कौतुक करताना थकत नाहीये.

सिनेमाच्या प्रोडक्शनमधील एका सूत्राने डबिंगवेळचा एक किस्सा सांगितला. त्याचे झाले असे की, सिनेमाच्या डबिंगवेळी नवाजने सिनेमातील तो सीन पाहिला ज्यात अमृताला ठाकरेंनी तुरुंगातून लिहिलेलं पत्र वाचायचं असतं.

या सिनेमात अमृताने बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीची म्हणजे मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. मीनाताई यांना ठाकरेंच्या जीवनातील सर्वात मजबूत आधारस्तंभ मानले जाते.

मीनाताई यांनी बाळासाहेबांच्या कठीण काळात फक्त त्यांचं धैर्य वाढवलं नाही, तर त्यांच्या प्रत्येक निर्णयात त्या ठामपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. नवाज डबिंग थिएटरमध्ये त्याने लिहिलेल्या पत्राला व्हॉइस ओव्हर द्यायला पोहोचला तेव्हा तो अमृताच्या अभिनयाने अवाक झाला. तो थिएटरच्या बाहेर आला आणि दिग्दर्शत अभिजीत पानसेला अमृताला फोन करायला सांगितला.

अमृताशी नवाज फोनवर बोलला. यावेळी तो फार भावूक झाला होता. नवाजने अमृताचं फोनवर भरभरून कौतुक केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 12:16 PM IST

ताज्या बातम्या