'ठाकरे' या चित्रपटात नवाजुद्दिन सिद्दिकीच साकारणार बाळासाहेबांची भूमिका !

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बायोपिक असलेल्या साहेब या चित्रपटात बाळासाहेब यांची भूमिका अजय देवगन नाहीतर नवाजुद्दिन सिद्दीकी हाच साकारणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय. बाळासाहेबांच्या गेटअपमधील नवाजुद्दिनचा फस्ट लूकचा फोटो देखील समोर आलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2017 05:37 PM IST

'ठाकरे' या चित्रपटात नवाजुद्दिन सिद्दिकीच साकारणार बाळासाहेबांची भूमिका !

21 डिसेंबर, मुंबई : हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बायोपिक असलेल्या साहेब या चित्रपटात बाळासाहेब यांची भूमिका अजय देवगन नाहीतर नवाजुद्दिन सिद्दीकी हाच साकारणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय. बाळासाहेबांच्या गेटअपमधील नवाजुद्दिनचा फस्ट लूकचा फोटो देखील समोर आलाय. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीच या चित्रपटाचं लेखन केलंय.

आज संध्याकाळी या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणार आहे. यावेळी ठाकरे कुटुंबियांसोबत अमिताभ बच्चनही आवर्जून उपस्थित राहणार आहेत. या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी नवाजुद्दिन सिद्दिकीने बरीच मेहनत घेतल्याचं या फर्स्ट लुक फोटोवरून दिसतंय. शिवसेनाप्रमुखांच्या वेशभूषत नवाजूद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांच्या देहबोलीची शैली या फोटोमध्ये आपल्याला पहायला मिळतेय. सफेद कुर्त्यामध्ये गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, डोळ्यांवरील चष्मा, डोक्यावरील केसांची स्टाईल, हातांची लकब हे सर्वकाही बाळासाहेबांसारखंच पाहायला मिळतंय. नवाजूद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडचा कसलेला अभिनेता आहे. त्यांनाही बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी मेहनत घेतल्याचं फोटोमध्ये दिसतंय.

या सिनेमातील बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी मध्यंतरी अजय देवगन याचंही नाव चर्चेत आलं होतं. पण सरतेशेवटी नवाजुद्दिन सिद्दिकीच याचीच या सिनेमात वर्णी लागलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2017 05:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...