नवाज शरीफ यांना अटक, रावळपींडीच्या जेलमध्ये होणार रवानगी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना पाकिस्तानात आल्यानंतर लगेच अटक करण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2018 10:23 PM IST

नवाज शरीफ यांना अटक, रावळपींडीच्या जेलमध्ये होणार रवानगी

इस्लामाबाद, ता. 13 जुलै : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना पाकिस्तानात आल्यानंतर लगेच अटक करण्यात आली. लाहोर विमानतळावर पोहोचताच दोघानांही सुरक्षा अधिकाऱ्यांनी अटक केली. शुक्रवारी सकाळी नवाज शरीफ हे त्यांची मुलगी मरियमसह लंडनवरून पाकिस्तानकडे रवाना झाले. एतिहाद एयरवेजच्या EY243 या फ्लाईटने ते अबुधाबीमार्गे लाहोरला आले.

लंडनवरून निघाताना मरियमने ट्विटरवर काही फोटो ट्विट करून शेअर केले. मरियम यांच्या मातोश्री कुलसूम नवाज यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू असून त्यांना भेटून निरोप घेतनाचे ते फोटो आहेत. सरकारने त्यांच्या अटकेची जय्यत तयारी केली होती.16 अधिकाऱ्यांचा एक गट त्यासाठी तयार करण्यात आला होता. येत्या 25 तारखेला पाकिस्तानात निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर या अटकेला महत्व प्राप्त झालंय.

शरीफ यांनी लष्कराला सातत्याने अंगावर घेतलं होतं. तर निवडणूकीत आपल्या पक्षाला फायदा मिळेल या शक्यतेने जोखमी घेऊन शरीफ हे पाकिस्तानात परतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 09:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...