मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं' नवनीत राणांची घणाघाती टीका

'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं' नवनीत राणांची घणाघाती टीका


उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाही

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाही

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाही

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India
  • Published by:  sachin Salve

अमरावती, 06 ऑक्टोबर : 'उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाही, असं म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सडकून केली. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडले ते ऐकण्यासाठी लोकं त्यांच्या सभेत आले होते' असंही राणा म्हणाल्या.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच दसरा मेळाव्याच भाषण पार पडलं. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

(Dasara Melava : 'आम्ही कायदा पाळायचा, अन् तुम्ही डुकरं पाळायची', ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार)

'एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढं नेऊ शकतात तर उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडलं आहे कारण सभेत उद्धव ठाकरे फक्त फिल्मचे डॉयलॉग सांगत होते, अशी खिल्ली नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंची उडवली.

('अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा 'वाघ' लागतो', मनसे आमदाराचा शिंदेंवर निशाणा)

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाही, अडीच वर्ष उद्धव ठाकरे घरात बसले होते त्यांनी फक्त फेसबुक लाईव्ह केलं, अशी टीकाही त्यांनी केली

उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलायला काही राहिलं नाही - महाजन

अमित शाहंवरही टीका

तर, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी दहा तोंडाचा पन्नास खोप्यांचा बकासुर म्हणत शिंदे सरकारवर घाणाघाती टीका केली आहे. या टीकेला भाजप नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देत उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलायला काही राहिलं नसून भाजपाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणतात मात्र ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मांडीवर जाऊन बसले. वेळप्रसंगी दोन मतांसाठी एमआयएमकडे गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाबाबत लोकांना कळले असून आता कितीही भावनिक होऊन शकता खाऊन उद्धव ठाकरे लोकांना बोलू शकत नाही, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

First published:

Tags: Marathi news, Shiv sena dasara melava