जेव्हा खासदार नवनीत राणा यांच्यातील डान्सर जागी होते, पाहा हा VIDEO

जेव्हा खासदार नवनीत राणा यांच्यातील डान्सर जागी होते, पाहा हा VIDEO

जवळपास 15 मिनिटे नवनीत राणा यांनी प्रशिक्षणार्थी महिलांसोबत नृत्यात सहभाग घेतला. अनेक महिलांनाही या दांडिया नृत्यचा आनंद घेतला.

  • Share this:

अमरावती, 27 सप्टेंबर : येत्या काही दिवसांत नवरात्रौत्सव सुरू होत आहे. या काळात अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर गरबा आणि दांडीया नृत्याची धमाल असते. त्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र यासाठी युवती, महिलांना खास प्रशिक्षण आयोजित केलं आहे. अमरावतीतील रचना नारी मंचने दांडीया नृत्याच्या प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे. या प्रशिक्षणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही हजेरी लावली आणि प्रशिक्षणात सहभाग घेतला.

जवळपास 15 मिनिटे नवनीत राणा यांनी प्रशिक्षणार्थी महिलांसोबत नृत्यात सहभाग घेतला. अनेक महिलांनाही या दांडिया नृत्यचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा दणदणीत पराभव करणाऱ्या खासदार नवनीत कौर राणा भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.

दरम्यान, नवनीत राणा या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत कामं करण्याचे त्यांच्या अनेक घटना आहे. कधी वारकऱ्यांसोबत विठू नामाचा गजर तर कधी सोयाबीनची पेरणी केली अशा कामांमुळे त्या नेहमी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आताही त्यांचा हा डान्स सगळीकडे गाजतोय. नवनीत

नवनीत राणा कौर यांच्या विजयाची ही आहेत महत्वाची कारणं!

विदर्भात लक्षवेधी ठरली ती अमरावती मतदारसंघातली निवडणूक. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्या नवनीत राणा कौर यांनी युतीचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. राणा यांनी गेल्या 5 वर्षात मतदार संघाची उत्तम बांधणी करून त्यांनी हे यश मिळवलं असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या - शरद पवार निर्णय बदलणार का? वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार विनंती

नवनीत राणा कौर यांचा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र, या पराभवानंतरही त्यांनी आपल्या मतदारांशी असलेला संपर्क कधीच कमी होऊ दिला नाही. त्यांनी सातत्याने संपर्क तर ठेवलाच त्याचबरोबर त्यांच्या मदतीसाठी त्या धावूनही गेल्या त्यामुळे मतदारांनी त्यांना यावेळी संधी दिली.

गेल्या पाच वर्षात त्यांनी 1 हजार 750 गावांना भेटी दिल्या. अडीच लाख महिलांशी थेट संपर्क साधल्याचं सांगितलं जातं. गेल्या पाच वर्षात नवनीत कौर राणा यांनी किमान दोन लाख महिलांशी सेल्फी काढला असंही सांगितलं जाते. नवनीत या तेलुगू अभिनेत्री असल्याने त्यांच्याविषयी एक आकर्षण आहे.

त्यामुळे महिलांमध्ये त्यांच्याविषयी आकर्षणाची भावना होती. तब्बल 1 लाख महिलांचं मतदान त्यांना झालं असंही आता सांगितलं जात आहे. अमरावती हा संमिश्र मतदारसंघ आहे. अमरावती सारखा शहरी भाग तर मेळघाटासारखा आदिवासी भागही त्यात आहे.

इतर बातम्या - Chandrayaan 2: नासाने प्रसिद्ध केला विक्रमच्या लँडिंग साइटचा फोटो!

त्यांच्या या कामामुळेच अमरावतीत वंचित फॅक्टर आणि मोदी फॅक्टरही चालला नाही. दलित, आदिवासी आणि मुस्लिमांनी त्यांना भरभरून मतं दिली असंही आता स्पष्ट झालंय. शिवसेनेचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्याविषयी कमालीची नाराजीची भावना होती. त्याचा फायदाही नवनीत कौर यांना मिळाला आहे.

VIDEO: शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

First Published: Sep 27, 2019 10:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading