मी घटनास्थळावरून पळून गेले नाही - नवज्योत कौर

मात्र आपण घटनास्थळावरून पळून गेलो नाही. या प्रकरणाचं राजकारण करू नये असं स्पष्टीकरण नवज्योत कौर यांनी दिलंय.

News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2018 09:45 PM IST

मी घटनास्थळावरून पळून गेले नाही - नवज्योत कौर

अमृतसर,ता.19 ऑक्टोबर : अमृतसरमधल्या रावण दहनाचा कार्यक्रम ज्या जोड फाटक बाजार भागात झाला तो भाग काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या मतदारसंघात येतो. या कार्यक्रमाला सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत सिद्धू या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमाला उशीरा आल्या आणि त्यांनी बचाव कार्यात मदत केली नाही असा आरोप करण्यात येतोय. मात्र आपण घटनास्थळावरून पळून गेलो नाही. या प्रकरणाचं राजकारण करू नये असं स्पष्टीकरण नवज्योत कौर यांनी दिलंय. मात्र घटनास्थळावर त्यांच्याविरूद्ध प्रचंड आक्रोश बघायला मिळला.

काँग्रेसच्या स्थानिक नेत्या असल्यानं नवज्योत कौर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्या कार्यक्रमाला खूप उशीरा आल्याचा आरोप लोकांनी केलाय. त्यांनी मदत कार्यात जी मदत करायला पाहिजे ती त्यांनी केली नाही असाही आरोप होतोय. मात्र नवज्योत कौर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

घटनेच्या आधी काही मिनिटे आधीच आपण कार्यक्रमस्थळावरून निघालो होता असही कौर यांनी सांगितलं. फटाक्यांचा आवाज आणि गोंधळ एवढा मोठा होता की काय होत आहे हे कुणालाच कळाले नाही. मी तातडीनं मदत कार्यात सहभगी झाली. नंतर दवाखाण्यातही जावून जखमींची विचारपूस केली असा खुलासा त्यांनी केला. सिद्धू शनिवारी लोकांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

रेल्वेने वेग कमी करायला पाहिजे होता असही त्या म्हणाल्या. दरवर्षी इथेच कार्यक्रम होतो. त्यामुळे यावर्षी कार्यक्रम का घेतला असा प्रश्न का विचारला जातो ते कळत नाही असंही त्यांनी सांगितलं.

 

Loading...

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2018 09:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...