नवी मुंबईत जयंवत सुतार हे राष्ट्रवादीचे नवे महापौर

नवी मुंबईत जयंवत सुतार हे राष्ट्रवादीचे नवे महापौर

नवी मुंबईत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार विजयी झालेत. त्यांनी शिवसेनेच्या सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. उपमहापौरपदी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे या विजयी झाल्या आहेत. 26 मतांनी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांचा पराभव केला. भाजपनं महापौरपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

  • Share this:

नवी मुंबई, 09 नोव्हेंबर : नवी मुंबईत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार विजयी झालेत. त्यांनी शिवसेनेच्या सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. उपमहापौरपदी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे या विजयी झाल्या आहेत. 26 मतांनी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांचा पराभव केला. भाजपनं महापौरपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे जयवंत सुतार यांना ६७ मते मिळालीत. तर उपमहापौर काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांनी ६४ मते मिळालीत. बंडखोरी केलेले काँग्रेसच्या उमेदवार वैजयंती भगत यांना केवळ ३ मते मिळालीत. तसेच शिवसेनेच्या द्वारकानाथ भोईर यांना ३८ मते पडलीत.

निवडणूक जाहीर झाली तेव्हा महापौरपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी करणारे विजय चौगुले यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला. जयवंत सुतार यांनी आरामात निवडणूक जिंकली. त्यांना राष्ट्रवादीची ५२, अपक्षांची ५ आणि काँग्रेसची १० अशी एकूण ६७ मते मिळाली.

नवी मुंबई महापालिकेच्या १११ सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांच्या मदतीने बहुमत मिळवले होते. मात्र काठावरचे बहुमत असल्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली. काँग्रेसला पहिले अडीच वर्ष उपमहापौरपदही दिले. काँग्रेसचे १० नगरसेवक आहेत. यावेळी मात्र काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी दिसून आली. नवी मुंबईचे मावळते महापौर सुधाकर सोनवणे यांना पक्षाने दिलेला कार्यकाल संपल्याने तिथं फेरनिवडणूक झालीय.

पालिकेतील पक्षीय बलाबल

एकूण जागा - १११

राष्ट्रवादी अपक्ष - ५७

शिवसेना - ३८

काँग्रेस - १०

भाजप - ६

First published: November 9, 2017, 8:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading