हप्ता दिला नाही म्हणून व्यवसाय बंद, महिलेने बाळालाच ठेवलं अधिकाऱ्याच्या टेबलवर

हप्ता दिला नाही म्हणून व्यवसाय बंद, महिलेने बाळालाच ठेवलं अधिकाऱ्याच्या टेबलवर

जो फेरीवाला हप्ते देईल त्यालाच फुटपाथवर बिनधास्त व्यवसाय करायला मिळणार. जो हप्ते देणार नाही त्यांनी आपले व्यवसाय बंद करायचे असा अघोषित फतवाच अधिकाऱ्यांनी काढलाय.

  • Share this:

विनय म्हात्रे, नवी मुंबई 23 जुलै : मुंबई असो की सुनियोजित शहर अशी ख्याती असलेलं नवी मुंबई. इथल्या रस्त्यांवर फेरीवाल्यांचा सुळसुटाळ झालाय हे आता काही नवं राहिलं नाही. महापालिकांचे अधिकारी हप्ते घेऊन राजरोसपणे हे धंदे सुरू ठेवतात. याचा अतिरेक झाल्याची घटना नवी मुंबईत घडलीय. हप्ता न दिल्याने अधिकाऱ्यांनी मिनल खैरे या महिलेचा व्यवसाय बंद केला. त्यामुळे घर कसं चालवायचं असा प्रश्न उभा राहिल्याने त्या महिलेने आपल्या लहान बाळालाच पालिका अधिकाऱ्याच्या टेबलवर ठेवल्याने एकच खळबळ उडालीय.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा घोळात घोळ, निवडणुका तोंडावर पण वाद मिटेना

जो फेरीवाला हप्ते देईल त्यालाच फुटपाथवर बिनधास्त व्यवसाय करायला मिळणार. जो हप्ते देणार नाही त्यांनी आपले व्यवसाय बंद करायचे असा अघोषित फतवा वाशी विभाग कार्यालयाने काढल्याने 20 वर्षांपासून मार्केट मध्ये व्यवसाय करणाऱ्या मिनल खैरेंना आपल्या बाळालाच महापालिका अधिकाऱ्याच्या टेबलावर आणून ठेवावं लागलं.

खुशखबर ! राज्य सरकारकडून नगरपालिका, मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

या महिलेचा दोष इतकाच की ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हफ्ता देत नव्हती. मागील 20 वर्षांपासून मोकळ्या जागेत व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेला व्यवसाय करण्यास अधिकाऱ्यांनी बंदी केली. विशेष म्हणजे शहरात सर्रास फुटपाथवर इतरांना व्यवसाय करून दिल जातोय. मग हा वेगळा न्याय या महिलेला का? असा सवाल त्या महिलेने  उपस्थित केलाय. ही महिला अधिकाऱ्यांना विनवण्या करत होती मात्र अधिकारी लक्षच देत नव्हते.

शरीरावर गंभीर जखमा करून आत्महत्येसाठी तरुणी चढली उंच इमारतीवर, मग....

शेवटी ती महिला आपल्या लहानग्या बाळाला घेऊन आली आणि तिने त्या बाळाला टेबलवरच ठेवले. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बाळाला हलविणार नाही असा इशाराच तीने दिला होता. शेवटी अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविण्याचं आश्वासन दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 04:09 PM IST

ताज्या बातम्या