9 ऑगस्टच्या मराठा आंदोलनातून नवी मुंबई बाहेर

9 ऑगस्टला मराठा समाजातर्फे महाराष्ट्रात करण्यात येणारं आंदोलन नवी मुंबईत होणार नाही असा निर्णय घेण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2018 09:22 AM IST

9 ऑगस्टच्या मराठा आंदोलनातून नवी मुंबई बाहेर

नवी मुंबई, 08 ऑगस्ट : 9 ऑगस्टला मराठा समाजातर्फे महाराष्ट्रात करण्यात येणारं आंदोलन नवी मुंबईत होणार नाही असा निर्णय घेण्यात आला. 25 तारखेला झालेल्या नवी मुंबई बंद वेळी 2 समाजात तेढ निर्माण झाला होता. त्यामुळे एका आंदोलकाला आपला जीव गमवावा लागला. या आंदोलनादरम्यान, समाजकंटकांमुळे पुन्हा ही तेढ आणखी वाढू नये, दोन्ही समाजात सलोखा निर्माण व्हावा यासाठी संपात सामील न होण्याचं नवी मुंबई सकल मराठा समाजाच्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

त्यामुळे आता 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा आंदोलनात नवी मुंबई सहभागी होणार नाही. नवी मुंबईमध्ये बंदची हाक देण्यात आलेली नाही आहे. असा नवी मुंबई मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय घेतला आहे. 25 तारखेला झालेल्या आंदोलनामध्ये नवी मुंबईमध्ये स्थानिक आणि मराठा असा वाद निर्माण झाला होता. या मोर्चात दोन गटामंध्ये वाद झाला होता. या वादातून कोपरखैराणे परिसरातील एकाचा मृत्यू झाला होता.

करुणनिधींच्या अंत्यसंस्कार ठिकाणावरून कोर्टात सुनावणी सुरू, थोड्याच वेळात निर्णय

आंदोलनात मिसळलेल्या काही हिंदी भाषिक समाजकंटकांकडून हिंसा घडवण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक आणि मराठा असा वाद पेटला. गेली अनेक वर्ष या दोन्ही गटांनी त्यांच्यातला एकोपा टिकून ठेवला होता आणि तो भविष्यातही टिकून रहावा यासाठी नवी मुंबईला आंदोलनातून वगळण्यात आलं आहे.

25 तारखेला झालेल्या आंदोलनात घणसोली, कोपरखैराणे परिसरात अनेक ठिकाणी वाहनांची जाळपळ आणि तोडफोड करण्यात आली होती. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नवी मुंबईतील आंदोलनात मराठा आंदोलनात रोहन तोडकर या आंदोलकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Loading...

हेही वाचा...

VIDEO : किकी चॅलेंजचं वेड मुंबईच्या लोकलमध्येही

नरेंद्र मोदी 2019 मध्ये कुठून लढणार निवडणूक, अमित शहांनी केला खुलासा

PHOTOS : पुण्यात चार गाड्यांचा विचित्र अपघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2018 09:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...