विनय म्हात्रे, प्रतिनिधी
नवी मुंबई, 05 फेब्रुवारी : नवी मुंबईच्या घणसोली सेक्टर 15मध्ये खाडी किनारी असलेल्या पाम बिच मार्गावर पॅराशूटने महिला उतरल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
काही व्यक्ती संशयस्पदरीत्या पॅराशूटमधून उतरून कारमधून निघून गेल्याचं काहींनी पाहिलं. पॅराशूटमधून उतरलेली महिला ही परदेशी असल्याचे प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी पोलीसांना सांगितलं आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीत दोन व्यक्ती चालत जाताना दिसत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलं.
सीसीटीव्ही फूटेज स्पष्ट दिसत नसल्याने याबद्दल अधिक तपास करण्यात अडचणी येत आहेत. मात्र पॅराशूटमधून उडताना कुणीच आढळून आलें नसल्याचं पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितलं.
पॅराशूटमधून खाली उतरतानाचा फोटोही पोलीसांना मिळालेला नाही. पण एक महिला ही पॅराशूटमधून उतरल्याचा प्रत्यक्षदर्शींनी दावा केला आहे. तशी माहिती त्यांनी पोलीसांना दिली आहे. त्यामुले आता पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
दरम्यान, अशा मार्गाने कोणी दहशतवादी परिसरात घुसला असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. पण यावर कोणतीही अफवा पसरू देऊ नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
या प्रकरणात नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहे. तर आता पोलीस प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार घटनास्थळी कसून चौकशी करत आहेत. या परिसरात साईबाबा मंदिर आहे. पण खाडी परिसर असल्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात शांतता असते.
LIVE मर्डर : तेरी-मेरी यारी संपली, मित्रावर 16 वार करून केली हत्या